१७ पोलीस अधिकारी, १८६ कर्मचाऱ्यांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST2021-02-07T04:29:07+5:302021-02-07T04:29:07+5:30

११ केंद्रे : १६३० पोलिसांची नोंदणी जालना : कोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ...

17 police officers, 186 employees vaccinated | १७ पोलीस अधिकारी, १८६ कर्मचाऱ्यांना लसीकरण

१७ पोलीस अधिकारी, १८६ कर्मचाऱ्यांना लसीकरण

११ केंद्रे : १६३० पोलिसांची नोंदणी

जालना : कोरोनाच्या लढ्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुक्रवारपासून कोरोनाची लस देण्यास प्रारंभ झाला. जिल्ह्यातील ११ केंद्रांवर ही लस दिली जात असून, आजवर १७ अधिकारी व १८६ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १६३० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.

कोरोनाच्या लढ्यात बाधितांची सेवा करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस प्रथम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. प्रारंभी जिल्ह्यातील १३ हजारांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १४ हजार ५२० डोस प्राप्त झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात १३ हजार डोस प्राप्त झाले होते. आजवर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ५५९४ जणांना कोरोनाचा डोस देण्यात आला आहे. आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आता पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील १५ अधिकारी व १६९ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर शनिवारी २ अधिकारी व १७ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत १६३० कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना लस देण्यात आली.

Web Title: 17 police officers, 186 employees vaccinated