व्हिडिओमध्ये स्वतःला आणि मैत्रिणीला पाहून तरुण हादरला! इंटरनेटवर पॉर्न शोधणे पडले महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:21 IST2026-02-07T17:08:19+5:302026-02-07T17:21:34+5:30
इंटरनेटवर पॉर्न व्हिडीओ सर्च करणाऱ्या एका व्यक्तीला असा काही अनुभव आला की तो पूर्णपणे हादरून गेला. एका व्हिडिओमध्ये त्याने चक्क स्वतःलाच पाहिले आणि त्याचे पाय खालची जमीनच सरकली. हा धक्कादायक प्रकार हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या 'एरिक' नावाच्या व्यक्तीसोबत घडला आहे.

व्हिडिओमध्ये स्वतःला आणि मैत्रिणीला पाहून तरुण हादरला! इंटरनेटवर पॉर्न शोधणे पडले महागात
इंटरनेटवर अडल्ट कंटेंट सर्च करणाऱ्या एका व्यक्तीला धक्कादायक अनुभव आला. यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. एका व्हिडिओमध्ये त्याने चक्क स्वतःलाच पाहिले. हा धक्कादायक प्रकार हाँगकाँगमध्ये राहणाऱ्या 'एरिक' नावाच्या व्यक्तीसोबत घडला आहे.
हॉटेलमधील गोपनीयतेचा प्रश्न किती गंभीर असू शकतो, याचा प्रत्यय देणारी एक थरारक घटना समोर आली आहे. इंटरनेटवर अडल्ट कंटेंट सर्च करत असलेल्या हाँगकाँगच्या 'एरिक' नावाच्या तरुणाला एका व्हिडिओमध्ये चक्क स्वतःलाच पाहून मोठा धक्का बसला. चीनमधील एका हॉटेलमध्ये गुपचूप शूट केलेला त्याचा आणि त्याच्या प्रेयसीचा खाजगी व्हिडीओ एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड करण्यात आला होता.
तांदूळ, गहू, दूध आणि चीज; अमेरिकेच्या कृषी आणि दुग्धजन्य पदार्थांवर बंदी घातली; संपूर्ण यादी पाहा
काय आहे व्हिडिओमध्ये?
एरिक आणि त्याची गर्लफ्रेंड २०२३ मध्ये चीनच्या दौऱ्यावर गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असताना त्यांच्या खोलीत छुप्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यात आले. व्हिडीओ फुटेजमध्ये एरिक आणि त्याची गर्लफ्रेंड खोलीत येतात, बॅगा खाली ठेवतात आणि एकमेकांशी जवळीक साधू लागतात. त्यांच्या प्रत्येक हालचालीचे चित्रीकरण होत आहे, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. हे कृत्य त्यांच्या संमतीशिवाय करण्यात आले असून जगातील हजारो लोकांनी हा व्हिडीओ ऑनलाइन पाहिला आहे.
भयावह अनुभव आणि मानसिक धक्का
एरिकने हा अनुभव अत्यंत 'भयावह' असल्याचे म्हटले आहे. त्याने जेव्हा याबद्दल आपल्या प्रेयसीला सांगितले, तेव्हा सुरुवातीला तिला तो थट्टा करत असल्याचे वाटले. मात्र, व्हिडीओ पाहिल्यानंतर ती घाबरली. या घटनेनंतर काही आठवडे या जोडप्याने एकमेकांशी संवादही साधला नाही. आता घराबाहेर पडताना ओळख लपवण्यासाठी ते हॅटचा वापर करतात आणि हॉटेलमध्ये राहणे पूर्णपणे टाळतात.
या धक्कादायक अनुभवानंतर एरिकचा 'स्पाई-कॅमेरा पॉर्नोग्राफी'कडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. त्याने अशा प्रकारचा कंटेट पाहणे आणि संबंधित वेबसाईटवर जाणे बंद केले आहे.
चीनमधील बेकायदेशीर जाळे
चीनमध्ये गेल्या १० वर्षांपासून 'स्पाईकॅम पॉर्न'चे मोठे रॅकेट सक्रिय आहे. तिथे पॉर्न कंटेंट तयार करणे आणि शेअर करणे बेकायदेशीर असूनही, हॉटेलच्या खोल्यांमध्ये गुप्तपणे कॅमेरे लावून असे व्हिडीओ रेकॉर्ड केले जातात.