मित्रांसोबत घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणाने विमानात बसल्यानंतर जे म्हटलं ते ऐकून सगळ्यांनाच घाम फुटला. विमान टेकऑफसाठी तयार असतानाच तरुण म्हणाला, माझ्या खिशात बॉम्ब आहे. त्यानंतर एकच खळबळ माजली. प्रवाशांना दरदरून घाम फुटला. आरडाओरड सुरु झाली. सुरक्षा कर्मचारी आले आणि त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले. त्यावेळी तो म्हणाला मी मस्करी केली. पण, ही मस्करी त्याला चांगलीच महागात पडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे अमेरिकेतील लॉडरडेल-हॉलिवूड आंतरराष्ट्रीय विमानतळावर. हा तरुण मित्रांसोबत कॅनसस सिटी येथे निघाला होता. तो मित्रांसोबत विमानात बसला.
स्पिरिट एअरलाईन्सचे विमान तत्काळ रोखले
विमान उड्डाण करण्यासाठी तयार झाले. त्याचवेळी तरुण म्हणाला, 'माझ्या खिशात बॉम्ब आहे.' त्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. आरडाओरड सुरू झाली. ही माहिती मिळताच विमानाचे उड्डाण तत्काळ रोखण्यात आले.
त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आणि विमान एका सुरक्षित अंतरावर नेण्यात आले. नंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तरुणाची आणि संपूर्ण विमानाची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी पकडल्यावर तरुण म्हणाला मी मस्करी केली.
विमानाला पाच तास उशीर
बॉम्बच्या या धमकीमुळे विमानाचे उड्डाण रोखले गेले. त्यानंतर पाच तास उशिराने हे विमान हवेत झेपावले. यामुळे कंपनीचे ४१ लाख रुपयांचे नुकसान जाले. पोलिसांनी या तरुणाला पकडून न्यायालयसमोर हजर केले.
मुलाची आई म्हणाली, तो मस्करी करत होता. माझा मुलगा धमकी देणार व्यक्ती नाही. न्यायाधीशांनी या मस्करीची गंभीर दखल घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर आहे, असे न्यायाधीश म्हणाले. न्यायाधीशांनी मुलाला सुधारगृहात पाठवले आणि त्याच्या मनोवैज्ञानिक तपासणी करण्याचे आदेशही दिले.