शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाबद्दल जगाला सतर्क करणाऱ्या चिनी डॉक्टरच्या सहकाऱ्याचा मृत्यू; दोन महिने होते कोमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 19:59 IST

वुहानमधील डॉक्टराचा आयसीयूमध्ये मृत्यू; वयाच्या ४२ व्या वर्षी निधन

बीजिंग: कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं शरीरात अतिशय विचित्र बदल आणि गुंतागुंत निर्माण झालेल्या चिनी डॉक्टरचा वयाच्या ४२ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. डॉ. हू वेईफेंग यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या त्वचेचा रंग काळा झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. २२ एप्रिलला ब्रेन हॅम्ब्रेज झाल्यानंतर वेईफेंग यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. तेव्हापासून वुहान टोंगजी रुग्णालयात कोमामध्ये होते. वेईफेंग यांच्या डोक्यात तयार झालेला अनावश्यक स्राव काढण्यासाठी शनिवारी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती एका डॉक्टरांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिली. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती सांगितली. डॉ. हू आणि त्यांचे सहकारी डॉ. यी यांचं शरीर कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर काळं पडलं. वुहानच्या केंद्रीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करताना पाच महिन्यांपूर्वी दोन्ही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली. डॉ. हू वेईफेंग यांनी डॉ. ली वेनलिअंग यांच्यासोबत काम केलं होतं. वेनलिअंग यांनीच जीवेघण्या कोरोना विषाणूबद्दल जगाला धोक्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मार्चमध्ये त्यांच्या आणखी दोन सहकाऱ्यांचा (मेई झोंगमिंग, झु हेपिंग) यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. या सगळ्या घटनाक्रमानंतर चीनकडे संशयानं पाहिलं जाऊ लागलं. चीनच्या वुहानमधून कोरोना जगभरात पसरला. प्राण्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या एका बाजारातून कोरोना पसरल्याचं चीननं जगाला सांगितलं. मात्र या प्राण्यांच्या मांसाचे नमुने चीननं जगापुढे आणले नाहीत. दोनच दिवसांपूर्वी चीननं यावरुनही यू-टर्न घेतला. वुहानमधील बाजाराला उगाच खलनायक ठरवण्यात आलं. कोरोना विषाणू या बाजारातून पसरलाच नव्हता, अशी भूमिका चीननं घेतली.लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे केजरीवालांच्याही पुढे; पण...खबरदारी घ्या, सूचनांचं पालन करा, वादळानंतर पर्यावरणमंत्र्यांचं जनतेला आवाहन...तर ठाकरे सरकार कोणीही वाचवू शकणार नाही; अमित शहांचं सूचक विधान

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन