गवत कापत होती महिला, मागून येऊन विमानाने मारली टक्कर; महिलेचा मृत्यू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:31 IST2021-07-07T19:25:55+5:302021-07-07T19:31:29+5:30
२७ वर्षीय महिला दुपारी साधारण १ वाजता मोंटरियालमधील सेंट-स्पिरिट एअरफिल्डजवळ ट्रॅक्टर चालवत गवत कापण्याचं करत होती.

गवत कापत होती महिला, मागून येऊन विमानाने मारली टक्कर; महिलेचा मृत्यू...
काही दिवसांपूर्वी कॅनडा तिथे वाढलेल्या तापमानामुळे आणि उष्माघातामुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडल्यामुळे चर्चेत होता. अशातच आता एका गवत कापणाऱ्या महिलेला एका प्लेनने टक्कर मारल्याची घटना समोर आली आहे. २७ वर्षीय महिला दुपारी साधारण १ वाजता मोंटरियालमधील सेंट-स्पिरिट एअरफिल्डजवळ ट्रॅक्टर चालवत गवत कापण्याचं करत होती. तेव्हाच अचानक एका छोट्या प्लेनने तिला टक्कर मारली.
एअरफिल्ड मेंटेन करणाऱ्या कंपनीसोबत ही महिला काम करत होती. या घटनेनंतर महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या दुर्घटनेत पायलटला काही झालं नाही. पण या घटनेमुळे त्याला धक्का बसला आहे. सीएनएनसोबत बोलताना क्यूबेक म्युनिसिपल पोलीस प्रवक्ता मार्क टेसिअर म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, महिला ट्रॅक्टरवर बसून गवत कापण्याचं काम करत होती.
मार्क पुढे म्हणाले की, हे प्लेन चीन द्वारे निर्मित नेनचेंग सीजे-६ आहे आणि या विमानाच्या ज्या विंगच्या भागाने महिलेला टक्कर मारली तो भाग डॅमेज झाल्याचंही दिसतं. प्लेनचा मालकच प्लेन चालवत होता. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचे अधिकारी सायमन पिअरे सीटीव्हीला म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि सध्याच यावर काही बोलणं घाईचं होईल. पूर्ण तपास केल्यावरच काही सांगता येईल.