शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 10:30 IST

भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक आणि उद्योग संस्था नॅसकॉम यांनी मॅकग्वायरवुड्स कन्सल्टिंग आणि अकिन गंप सारख्या त्यांच्या लॉबिस्टना सक्रिय केले. पण निर्णायक दबाव अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांकडून आला

हरीश गुप्ता नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसाबाबत ३६ तासात यूटर्न घेतला आहे. अर्थात हा त्यांचा निर्णय नव्हता तर, कठोर अर्थकारण, भारतीय मुत्सद्देगिरी आणि जोरदार दबावामुळे हा निर्णय झाला. 

प्रत्येक एच-१बी व्हिसासाठी एक लाख डॉलर शुल्काच्या प्रस्तावामुळे तंत्रज्ञान जगतात घबराट पसरली. एकूण एच-१बी व्हिसापैकी ७१% भारतीयांना मिळतात. यामुळे भारताच्या २५० अब्ज डॉलर्सच्या आयटी सेवा क्षेत्राला आणि त्याच्या कुशल कामगारांवर अवलंबून असलेल्या अमेरिकन कंपन्यांना धोका निर्माण झाला. मोदी सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून वॉशिंग्टनमध्ये अतिरिक्त लॉबिस्ट नियुक्त केला.

त्याचबरोबर, भारतीय आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रो, एचसीएलटेक आणि उद्योग संस्था नॅसकॉम यांनी मॅकग्वायरवुड्स कन्सल्टिंग आणि अकिन गंप सारख्या त्यांच्या लॉबिस्टना सक्रिय केले. पण निर्णायक दबाव अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांकडून आला. अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांनी २०२४ मध्ये लॉबिंगवर ७५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले. मेटा, ॲमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि आयबीएम आदी कंपन्यांनी असा दावा केला की, व्हिसा नियम कडक झाले तर अब्जावधी डॉलरचे नुकसान होईल. भारतीय मुत्सद्देगिरी आणि अमेरिकन कॉर्पोरेट लॉबिंगच्या एकत्रित शक्तीमुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली.  

३६ तासांत यू-टर्न प्रस्तावित फी : एक लाख डॉलर प्रति व्हिसा.एकूण एच-१बी मंजुरीत ७१% भारतीय.भारताचा आयटी क्षेत्राचा आकार : २५० अब्ज डॉलर्स.प्रस्ताव मागे : ३६ तासांत.   

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प