शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

चीनला मसूद अजहरचा एवढा पुळका का?; 'ही' आहे ड्रॅगनची चाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:10 AM

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे

जिनिव्हा - पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अजहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता. 2017 सालीही चीनने अशाप्रकारे प्रस्तावाला विरोध केला होता. गेल्या 10 वर्षातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा हा चौथा प्रस्ताव आहे. 

नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, आम्ही या प्रकारामुळे निराश आहोत, पण सर्व पर्यांयावर आम्ही काम करतोय, भारतीय नागरिकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगाराला न्यायालयात उभं करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला ज्या देशांनी पाठिंबा दिला अशा देशांचा भारत आभारी आहे. 

मसूद अजहरला बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समितीमध्ये फ्रान्स, ब्रिटेन आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारीला आणला होता. 2017 मध्येही चीनने अजहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं. मसूद अजहरला पाठिशी घालण्याचे काम चीन नेहमी करत आलाय. त्यावेळी चीनने मसूद अजहर आजारी असून आता तो कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी नसल्याचं सांगितले होते. 

चीनच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष 

चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्हिटो  पावर असलेला देश आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष चीनच्या भूमिकेकडे लागून राहिलं होतं. कारण याआधीही अनेकदा चीनने भारताच्या प्रयत्नांना खोडा घालण्याचं काम केलं होतं. सुनावणीच्या आधी भारताने अमेरिका आणि फ्रान्सला पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण कागदपत्रे सोपवली होती, मसूद अजहरच्या विरोधात ठोस पुरावे भारताने जमा केले होते. 

अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूदअनेक वर्षापासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जैशच्या संस्थापकावर बंदी आणली जात नाही. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. जानेवारी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यसाठी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या होत्या. यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला मात्र चीनने विरोध केला. 

या कारणांसाठी चीनचा भारताला विरोध 

आशिया खंडामध्ये भारताचं वर्चस्व रोखण्यासाठी आणि OBOR प्रकल्पासाठी चीनला पाकिस्तानची गरज मुस्लिम देश आणि अलिप्त राष्ट्राच्या संघटनेसाठी पाकिस्तानाची चीनला मदत भारत-अमेरिका यांच्यातील मैत्री, त्यामुळे मसूदसारख्या मुद्द्यांवर भारताला अडकविण्याचा प्रयत्न तिबेटचे धर्मगुरु दलाई मामा भारताचं समर्थन करतात म्हणून ड्रॅगनची होते चीड 

टॅग्स :masood azharमसूद अजहरchinaचीनJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मद