शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 02:02 IST

ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते.

हाँगकाँगमध्ये २६ नोव्हेंबर रोजी एका अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या भीषण आगीवर अद्याप पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या बहुमजली निवासी इमारतीमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बचाव पथक गुरुवारी (२८ नोव्हेंबर २०२५) दुसऱ्या दिवशीही प्रयत्न करत होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून ८३ वर पोहोचला आहे. तर २८० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. गेल्या ७० वर्षांतील ही शहरातील सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या दुर्घटनेत सुमारे ७६ लोक जखमी झाले आहेत, यांपैकी ४३ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये एका अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे. सातपैकी चार ब्लॉकमधील आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमनदलाला यश आले असून, उर्वरित ३१ मजली इमारतींच्या वरच्या मजल्यांवर संध्याकाळपर्यंत आग धगधगत होती. बचाव कार्य अद्यापही सुरू असून इमारतीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात येत आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही -महत्वाचे म्हणजे, या इमारतींना आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही. याप्रकरणी गुन्हेगारी तपास सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. सात इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या असून, प्रत्येक इमारत ३२ मजली होती. हाँगकाँग सरकारने पीडितांसाठी ३० कोटी हाँगकाँग डॉलर (सुमारे ४.३ कोटी अमेरिकन डॉलर) च्या मदतीची घोषणा केली आहे. ताई पो जिल्ह्यात १९८३ मध्ये वांग फुक कोर्ट परिसरात बांधलेल्या या आठ बहूमजली इमारती आहेत. यांत 1984 फ्लॅट आहेत. यांत ४,६०० लोक राहत होते.

चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआच्या माहितीनुसार, हाँगकाँग पोलिसांनी या अग्निकांडप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी जबाबदार असलेल्या बांधकाम कंपनीचे ते अधिकारी आहेत. नूतनीकरणाच्या कामात वापरलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे आग वेगाने पसरली असावी, असा पोलिसांचा कयास आहे. याशिवाय, पोलीस अधीक्षक एलीन चुंग यांनी म्हटले आहे की, "कंपनीच्या जबाबदार पक्षांचा घोर निष्काळजीपणा या दुर्घटनेला आणि मोठ्या जीवितहानीला कारणीभूत आहे."

English
हिंदी सारांश
Web Title : Hong Kong Fire: 83 Dead, Negligence Suspected in 70-Year Disaster

Web Summary : A massive Hong Kong apartment fire killed 83, with over 280 missing. Negligence by a construction company during renovations, possibly involving flammable materials, is suspected. The government has announced $43 million in aid for victims of the 1983-built complex.
टॅग्स :chinaचीनfireआगDeathमृत्यू