"परिस्थिती कोणत्या दिशेला जाणार? सांगणं कठीण"; मिडिल इस्टमधील तणावावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:22 IST2026-03-06T14:20:34+5:302026-03-06T14:22:04+5:30
पर्शियन आखातातील अस्थिरता ही भारतासह संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरू शकते. या अनिश्चिततेचा थेट फटका जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवस्थेला बसेल.

"परिस्थिती कोणत्या दिशेला जाणार? सांगणं कठीण"; मिडिल इस्टमधील तणावावर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले
मध्यपूर्वेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिका, इस्रायल किंवा इराण यांपैकी कुणीही मागे हटण्यास तयार नाही. या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली. "सध्यस्थिती असामान्य आहे आणि ती भविष्यात कोणत्या दिशेला जाईल, हे सांगणे कठीण आहे," असे विधान राजनाथ सिंह यांनी केल आहे.
कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना संरक्षण मंत्र्यांनी राजथान सिंह म्हणाले, "होर्मुझ सामुद्रधुनी(Strait of Hormuz) क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला, तर त्याचा थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्था आणि तेल-गॅस पुरवठा साखळीवर (Supply Chain) होईल. पर्शियन आखातातील अस्थिरता ही भारतासह संपूर्ण जगाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी मोठे आव्हान ठरू शकते. या अनिश्चिततेचा थेट फटका जागतिक व्यापार आणि आर्थिक व्यवस्थेला बसेल.
युद्धाच्या बदलत्या स्वरूपासंदर्भात काय म्हमाले सिंह? -
यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केले. सध्या विविध देश केवळ जमीन, हवा किंवा समुद्रातच नव्हे, तर अवकाशातही (Space) एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. यामुळे भविष्यातील आव्हाने अधिक कठीण होतील.
सध्यस्थिती अत्यंत गुंतागुंतीची बनली असून, भविष्यात ती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. या तणावपूर्ण आणि संघर्षमय परिस्थितीला आता 'नवा नॉर्मल' (New Normal) मानले जात आहे, हीच सर्वात चिंतेची गोष्ट आहे. असेही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.