शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युआधी जास्तीत जास्त लोक कोणते ३ शब्द बोलतात? नर्सने केला खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 18:31 IST

ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स....

अमेरिकेतील (America) एका नर्सने सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. या नर्सचं नाव ज्यूली आहे. ती म्हणाली की, मृत्युच्या ठीक आधी जास्तीत जास्त लोक काय बोलतात. ज्यूलीने टिकटॉकवरील एका व्हिडीओत हा खुलासा केला. तिने हॉस्पिटलमधील तिचे अनुभव शेअर केले आहेत. चला जाणू घेऊ काय म्हणाली नर्स....

हॉस्पिस नर्स ज्यूलीने सांगितलं की, तिने कॅलिफोर्नियाच्या (California) लॉस एंन्जलिसमध्ये (Los Angelis)  नर्स म्हणून जवळपास ५ वर्षे काम केलं. याआधी ९ वर्षे ती आयसीयूमध्ये नर्स होती. ती साधारण १४ वर्षापासून नर्सचं काम करत आहे.

ज्यूली फार जास्त आजारी, ज्यांचा कधीही जीव जाऊ शकतो अशा रूग्णांची देखरेख करते. तिने बऱ्याच लोकांना आपल्या डोळ्यासमोर अखेरचा श्वास घेताना पाहिलं आहे. नुकतंच तिने एका टिकटॉक व्हिडीओत सांगितलं की, मृत्युआधी जास्तीत जास्त लोक काय बोलतात?

मृत्युआधी काय होतं?

ज्यूलीने सांगितलं की, मृत्युच्या ठीक आधी तिने जास्तीत जास्त रूग्णांच्या श्वास घेण्याच्या पद्धतीत बदल होताना पाहिलंय. त्यासोबतच त्वचेच्या रंगात बदल, ताप येणे, पुन्हा-पुन्हा जवळच्या लोकांचं नाव घेणे इत्यादी लक्षणे तिने रूग्णांमध्ये पाहिली आहेत. 

ज्यूली पुढे म्हणाली की, 'जास्तीत जास्त लोक सामान्यपणे 'आय लव्ह यू' म्हणतात किंवा ते त्यांच्या आई-वडिलांना हाका मारतात, जे आधीच या जगात नसतात'.

एका दुसऱ्या व्हिडीओत ज्यूली म्हणाली की, अखेरचा श्वास घेण्याआधी तिच्या जास्तीत जास्त रूग्णांना सावल्या दिसत होत्या. सावल्यांमध्ये ते त्यांच्या मृत्युमुखी पडलेल्या जवळच्या लोकांना बघत होते. आणि म्हणत होते की, ते 'घरी' येत आहेत. नर्स पुढे म्हणाली की, माझ्याकडे मृत्यू आणि मरणाबाबत बरीच माहिती आहे. ज्याबाबत जास्त लोकांना माहिती नसते.   

टॅग्स :Californiaकॅलिफोर्नियाInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके