शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

२१०० सालापर्यंतचे हवामान अंदाज

By admin | Published: June 11, 2015 11:48 PM

नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे हवामानात होणारे बदल व पावसाचे प्रमाण याविषयी २१०० सालापर्यंतचे अंदाज व्यक्त केले असून

न्यूयॉर्क : नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे हवामानात होणारे बदल व पावसाचे प्रमाण याविषयी २१०० सालापर्यंतचे अंदाज व्यक्त केले असून, या माहितीचा वापर २१०० सालापर्यंत जगात कोठे असे वातावरण असेल हे जाणून घेण्यासाठी होणार आहे. यासाठी पृथ्वीच्या विविध भागांचे प्रतिनिधित्व करणारी २१ मॉडेल तयार केली असून, त्यावरून अचूक अंदाज बांधणे शक्य आहे. नासाच्या या शास्त्रज्ञात एक भारतीय शास्त्रज्ञही आहे ही अभिमानाची बाब आहे. या मॉडेलमुळे विविध कालावधीत हवामान कसे बदलेल, पावसाचे प्रमाण किती राहील म्हणजेच वाढत्या तापमानाचा काय परिणाम होईल हे जाणून घेणे शक्य होणार आहे. दुष्काळ, पूर, उष्णतेच्या लाटा व कृषी उत्पादनात येणारी तूट यांचेही आकलन करणे शक्य होणार आहे, असे नासाचे प्रमुख शास्त्रज्ञ एलन स्टोफन यांनी म्हटले आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानाबरोबर आयुष्याची सांगड कशी घालावी याची माहिती या नव्या ग्लोबल डाटासेटवरून मिळणार आहे. नासाच्या नासा अर्थ एक्स्चेंज (एनईएक्स) कार्यक्रमाचे हे नवे उत्पादन आहे. २०१३ साली नेक्सने अमेरिकेसाठी असा माहितीपट तयार केला होता. त्याचाच वापर देशाच्या कृषी क्षेत्र, जंगले, नद्या व शहरावर हवामान बदलाचा काय परिणाम होईल याचा अंदाज घेण्यासाठी केला जात आहे. हवामान संशोधनाचा हा मूलभूत आराखडा असून जगातील विविध प्रदेशांसाठी तो उपयोगी पडण्यासारखा आहे, असे नेक्सचे प्रकल्पशास्त्रज्ञ रामकृष्ण नेमाणी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)