Donal Trump On Iran War: "इराणमधील नव्या राजवटीसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच करार होईल आणि होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली जाईल. पण, असे झाले नाहीतर अमेरिकाइराणमधील मुक्काम संपवण्यापूर्वी इराणला उद्ध्वस्त करेल. त्यांच्या तेल विहिरी, खार्ग बेट आणि इतकंच नाही, त्यांचे जलशुद्धिकरण प्रकल्पही उडवू", अशी थेट धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट करत इराणसोबत सुरू असलेल्या चर्चेबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी लवकरच करार होईल, असा दावा केला आहे. त्याचबरोबर होर्मुझ सामुद्रधुनी व्यवसायासाठी खुली केली गेली नाही,तर सैन्य माघारीपूर्वी सगळं नष्ट करू असेही म्हटले आहे.
ट्रम्प म्हणाले, लवकरच करार होईल
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "इराणमधील आमची लष्करी कारवाई थांबवण्यासाठी अमेरिका एका नवीन आणि अधिक समजूतदार अशा राजवटीसोबत गंभीर चर्चा करत आहे. यात मोठी प्रगतीही झाली आहे, परंतु जर कोणत्याही कारणास्तव लवकरच करार होऊ शकला नाही (जो बहुधा होईलच)."
जल शुद्धीकरण प्रकल्पही उद्ध्वस्त करू
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, "आणि जर होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने 'व्यापारासाठी खुली' केली गेली नाही, तर आम्ही इराणमधील आमचा छानसा 'मुक्काम' संपवू, पण त्यापूर्वी त्यांचे सर्व वीज निर्मिती प्रकल्प, तेलाच्या विहिरी आणि खार्ग बेट (आणि शक्यतो समुद्राचे पाणी गोडे करणारे सर्व प्रकल्प, ज्यांना आम्ही हेतुपुरस्सर अद्याप 'हात लावलेला' नाही) उडवून देऊन आणि पूर्णपणे नष्ट करू", असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
"जुन्या राजवटीच्या ४७ वर्षांच्या 'दहशतीच्या काळात' इराणने निर्घृणपणे केलेल्या हत्या आणि मारलेल्या आमच्या अनेक सैनिकांचा आणि इतरांचा हा बदला असेल", असेही ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर टोल लावण्याच्या हालचाली
एकीकडे ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनी लवकरात लवकर खुली करण्यासाठी दबाव आणला जात असताना आणि धमक्या दिल्या जात असतानाच इराणमध्ये मात्र वेगळंच सुरू आहे. इराण आता होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करणाऱ्या जहाजांकडून टोल वसूल करणार आहे.
इराणी खासदार अलादीन बोरुजेर्दी यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनीशी संबंधित नवीन संसदीय योजनेला लवकरात लवकर मंजुरी दिली जाणार आहे. या नव्या योजनेनुसार, इराणच्या परवानगीशिवाय कोणत्याही जहाजाला होर्मुझ पार करता येणार नाही.
होर्मुझ सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांकडून इराण टोल वसूल करण्याची तयारी करत आहे. कारण सुरक्षा ठेवण्यासाठी आणि इथून जाणाऱ्या जहाजांना सेवा देण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळेच टोल वसुलीसाठी एक मार्गदर्शन नियमावली तयार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
Web Summary : Trump warned Iran that if a deal isn't reached and the Strait of Hormuz isn't opened for trade, the U.S. will destroy Iran's oil wells, power plants and water purification facilities before leaving. Iran plans to collect tolls from ships passing through Hormuz.
Web Summary : ट्रंप ने ईरान को चेतावनी दी कि यदि समझौता नहीं हुआ और होर्मुज जलडमरूमध्य व्यापार के लिए नहीं खोला गया, तो अमेरिका ईरान छोड़ने से पहले उसके तेल कुओं, बिजली संयंत्रों और जल शोधन सुविधाओं को नष्ट कर देगा। ईरान होर्मुज से गुजरने वाले जहाजों से टोल वसूलने की योजना बना रहा है।