आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 05:40 IST2026-05-17T05:39:32+5:302026-05-17T05:40:30+5:30

'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी तैवान संदर्भातील चीनच्या भूमिकेवर महत्त्वाचे संकेत दिले. चीनला तैवानवर पूर्ण ताबा मिळवायचा नाही, तर तैवानने स्वतःला स्वतंत्र देश घोषित करू नये, एवढीच त्यांची इच्छा आहे.

We are both great leaders of the world; Trump calls the visit historic, names Jinping meeting as 'G-2' | आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण

आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण

वॉशिंग्टन : दोन दिवसांचा चीन दौरा आटोपून शुक्रवारी संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मायदेशी परतले. त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या या ऐतिहासिक चर्चेचे वर्णन 'दोन महान देशांचे नेते' म्हणजेच 'जी-२' (ग्रुप ऑफ टू) अशा शब्दांत केले आहे. जागतिक इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण ठरेल, असा विश्वास त्यांनी वॉशिंग्टनजवळील 'जॉइंट बेस अँड्र्यूज' येथे उतरल्यानंतर व्यक्त केला.

तैवानच्या मुद्द्यावर सावध भूमिका
'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी तैवान संदर्भातील चीनच्या भूमिकेवर महत्त्वाचे संकेत दिले. चीनला तैवानवर पूर्ण ताबा मिळवायचा नाही, तर तैवानने स्वतःला स्वतंत्र देश घोषित करू नये, एवढीच त्यांची इच्छा आहे. मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत चीन तैवानविरोधात कोणतेही आक्रमक पाऊल उचलणार नाही, पण मी सत्तेत नसताना ते तसा प्रयत्न करू शकतात, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला युद्ध नको असून चीनने या मुद्द्यावर आता शांत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वर्षभरात तीन भेटींची शक्यता
ट्रम्प आणि जिनपिंग यांच्यात वर्षभरात तीन मोठ्या बैठकांची शक्यता आहे. जिनपिंग सप्टेंबरला वॉशिंग्टनला जात असून नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये ‘अपेक’ परिषद आणि डिसेंबरमध्ये मायामीमध्ये ‘जी-२०’ परिषद होत आहे.

चीनची मुत्सद्देगिरी आणि  ट्रम्प कमी पडल्याची चिंता
'वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या 'जी-२' या शब्दप्रयोगामुळे चीनला जागतिक पातळीवर अमेरिकेच्या तोडीस तोड महासत्ता म्हणून अधिकृत स्थान मिळाले आहे, जे मिळवण्यासाठी चीन गेल्या अनेक दशकांपासून प्रयत्नशील होता.
मात्र, माजी चिनी राजदूत निकोलस बर्न्स यांनी ट्रम्प यांच्या या मवाळ भूमिकेवर टीका करत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या चिंता तितक्याच चीनपुढे परखडपणे मांडायला हव्या होत्या, असे मत व्यक्त केले.

चीनकडून २०० बोईंग विमानांची विक्रमी खरेदी
चीनने अमेरिकेच्या 'बोईंग' कंपनीकडून २०० विमाने खरेदी करारावर स्वाक्षरी केली असून, भविष्यात आणखी ७५० विमाने घेण्याचे आश्वासन दिले आहे. 
'बोईंग' आणि चीन यांच्यात हा करार ऐतिहासिक आहे कारण गेल्या एका दशकातील बोईंगचा चीनसोबतचा हा पहिलाच सर्वात मोठा करार असून, अमेरिकेच्या विमान कंपनीसाठी ही एक मोठी व्यावसायिक संधी मानली जात आहे. याशिवाय अमेरिकेच्या कृषी क्षेत्राला चालना देणारे अनेक महत्त्वाचे करारही या दौऱ्यात करण्यात आले. 

Web Title : ट्रंप ने चीन यात्रा को 'ऐतिहासिक' बताया, 'जी-2' बैठक कहा।

Web Summary : ट्रंप ने अपनी चीन यात्रा को 'जी-2' बैठक बताया। चीन ताइवान की स्वतंत्रता घोषणा को रोकना चाहता है। सौदों में बोइंग विमान खरीद शामिल है, जिससे अमेरिकी कृषि को बढ़ावा मिलेगा। आलोचकों को चीन का प्रभाव बढ़ता दिखा।

Web Title : Trump dubs China visit 'historic,' calls it 'G-2' meeting.

Web Summary : Trump hailed his China visit, terming it a 'G-2' meeting. China aims to prevent Taiwan's independence declaration. Deals include Boeing aircraft purchases, boosting US agriculture. Critics see China gaining influence.