इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 23:31 IST2025-10-24T23:30:48+5:302025-10-24T23:31:50+5:30
आदिल अकबर यांची अलीकडेच बलुचिस्तानहून इस्लामाबादला बदली करण्यात आली होती

इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
कराची - इस्लामाबाद पोलीस अधीक्षक आदिल अकबरच्या रहस्यमय मृत्यूनंतर पाकिस्तानात खळबळ माजली आहे. डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमोर्टम रिपोर्टमधून समोर आले. परंतु आदिल यांना कुणी गोळी मारली याचे कुठलेही पुरावे नाहीत. आदिल अकबर जेव्हा कॉन्स्टिट्यूशन एवेन्यू ऑफिसला जात होते तेव्हा अचानक त्यांच्या कारमध्येच त्यांना गोळी लागल्याने मृत्यू झाला असं पोलीस सांगत आहेत.
मृत्यूच्या तपासासाठी उच्चस्तरीय चौकशी
पोलीस अधीक्षकाच्या रहस्यमय मृत्यूने पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उभे केलेत. एसपी अकबर एक ज्येष्ठ आणि अनुभवी अधिकारी होते. आदिल अकबर यांच्या मृत्यूमध्ये आत्महत्येचा अँगल तपासण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. या घटनेत वापरण्यात आलेले बंदूक पोलिसांनी जप्त केले आहे. सरकारी गनमॅनकडून त्यांनी बंदूक घेतली आणि स्वत:च्या डोक्यात मारली असं सांगितले जात आहे. पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी यांनी सांगितले की, इस्लामाबादच्या पोलिस महानिरीक्षकांच्या देखरेखीखाली एक उच्चस्तरीय तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालांनुसार, एसपी आदिलने त्यांच्या वाहनात स्वतःवर गोळी झाडली. तपास समितीमध्ये डीआयजी मुख्यालय, डीआयजी इस्लामाबाद आणि डीआयजी सुरक्षा यांचा समावेश आहे.
बलुचिस्तानहून इस्लामाबादला बदली
आयजींनी दिलेल्या माहितीनुसार, एसपी आदिल अकबर यांनी त्यांच्या वाहनात स्वतःवर गोळी झाडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणताही बाह्य हल्ला दिसत नाही. सर्व काही वाहनाच्या आत घडले आहे हे दिसते. आदिल अकबर यांची अलीकडेच बलुचिस्तानहून इस्लामाबादला बदली करण्यात आली होती. घटनेच्या वेळी उपस्थित असलेले त्याचे सहकारी, ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.
सोशल मीडियावर भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा
आदिल अकबरच्या मृत्यूनंतर अनेक सोशल मिडिया युजरकडून ते भारतीय गुप्तहेर असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आणि ऑपरेशन सिंदूर वेळी त्यांनी भारताला मदत केली होती. या आरोपांबद्दल पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र इस्लामाबाद पोलीस शहराचे एसपी आदिल अकबर हे भारतीय एजंट होते. त्यांनी आज स्वतःवर गोळी झाडली. ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांची माहिती खूप उपयुक्त ठरली. धन्यवाद, आदिल भाई, तुम्ही खूप मदत केली असं एका सोशल मिडिया युजरने लिहिले आहे.
SP City of Islamabad Police Adeel Akbar was an agent of India
— Akshit Singh 🇮🇳 (@IndianSinghh) October 23, 2025
He shot himself today .
His inputs were very helpful during Op Sindoor.
Thank you Adeel bhai , you have been a great help. pic.twitter.com/XZhcZTKZmn