"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 11:03 IST2025-10-03T11:01:01+5:302025-10-03T11:03:09+5:30
“मोदी कधीही अपमानजनक निर्णय घेणार नाहीत...”

"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोची येथे आयोजित वल्दाई डिस्कशन क्लबमध्ये बोलताना अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या धोरणांवर सडकून टीका केली. यावेळी, पश्चिमेकडील देशांचे नेते ‘युद्धाची भीती’ पसरवत, आपल्या देशांतर्गत समस्यांवरील जनतेचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, रशिया-युक्रेन युद्धात नाटो देश थेट सहभागी असूनही रशियन सेना आत्मविश्वासाने पुढे सरकत आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
'...तर मग नाटो कोण?' -
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला ‘कागदी वाघ’ संबोधले होते. याला प्रत्युत्तर देत पुतीन म्हणाले, “जर आम्ही कागदी वाघ असूनही नाटोविरुद्ध लढत आहोत, तर मग नाटो कोण?” तसेच चलनवाढ कमी करणे व आर्थिक वृद्धी टिकवणे गरजेचे असून रशियन अर्थव्यवस्था अधिक बळकट करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
“मोदी कधीही अपमानजनक निर्णय घेणार नाहीत” -
भारताला उद्देशून पुतिन म्हणाले, “अमेरिकाभारताला रशियन ऊर्जा खरेदी न करण्यास सांगत आहे. मात्र, असे झाले तर भारताचाच तोटा होईल. भारतीय जनता आपल्या नेतृत्वाच्या निर्णयावर लक्ष ठेवून आहे आणि अपमान कधीही सहन करणार नाही.” यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतुक केले. “मोदी कधीही अपमानजनक निर्णय घेणार नाहीत,” असा विश्वासही पुतिन यांनी यावेळी व्यक्त केला.
पुतिन यांनी ब्रिक्सच्या स्थापनेसाठी भारत आणि चीनचे आभार मानले. ब्रिक्सची स्थापना भारत आणि चीनसारख्या देशांमुळेच शक्य झाली, याची आठवण करून देत पुतिन म्हणाले की, हे देश न्यायपूर्ण जागतिक व्यवस्था घडविण्यासाठी पुढाकार घेत आहेत.