Video: इराणने अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडले, हवेतील थराराचा व्हिडीओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 12:11 IST2026-03-02T12:08:36+5:302026-03-02T12:11:56+5:30
अमेरिका आणि इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर दिले जात असून, इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान एफ १५ पाडल्याची माहिती समोर आली आहे.

Video: इराणने अमेरिकेचे F-15 लढाऊ विमान पाडले, हवेतील थराराचा व्हिडीओ आला समोर
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण संघर्ष हळूहळू वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले सुरू झाल्यानंतर इराणनेही हल्ले वाढवले आहेत. देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण खवळला असून, इस्रायलबरोबर अमेरिकेच्या हवाई तळांना लक्ष्य करत आहे. इराणने अमेरिकेचे एफ १५ हे लढाऊ विमान कुवैतमध्ये पाडले. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
इस्रायल-अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य पूर्वेत हाहाकार उडाला आहे. इराणने इस्रायलवर हल्ले करण्याबरोबरच शेजारी देशातील अमेरिकेचे हवाई तळे आणि दूतावासांनाही लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. हा लष्करी संघर्ष विकोपाला गेला असून, इराणच्या हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे.
कुवैतमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले
जगातील सर्वात घातक लढाऊ विमानांपैकी एक असलेले एफ १५ हे विमान पाडण्यात आले. इराणने हे विमान पाडल्याची माहिती आहे. कुवैतमध्ये हे विमान पाडण्यात आले असून, विमान खाली कोसळतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत.
Iran strikes hard a U.S. F-15 fighter jet in Kuwait has reportedly been hit by an Iranian missile.”
— Shahid Khan Yousafzai (@shahidkhan_y) March 2, 2026
Shockwave in the Gulf: An Iranian missile has taken aim at a U.S. F-15 in Kuwait.#Kuwait#IranWar#USApic.twitter.com/aRPVWQLA37
विमान हवेत असतानाच मिसाईल वेध घेते आणि लढाऊ विमान एफ १५ हे गिरक्या घेत खाली कोसळताना दिसत आहे. सुदैवाने या विमानातील वैमानिक बचावला आहे. इराणकडून हे विमान पाडल्याचा दावा केला जात असला, तरी याला कुवैत वा अमेरिकेने अद्याप दुजोरा दिलेला नाही.
Breaking: Iran has shot down a US fighter jet F-15 in Kuwait. pic.twitter.com/AH3tRqPTKa
— Tahir Shah (@TahirShah687) March 2, 2026
अमेरिकेचे इराणच्या हवाई तळांवर हल्ले
अमेरिकेकडून इराणच्या हवाई तळांवर हल्ले केले जात आहे. इराण अनेक लष्करी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे व्हिडीओही जारी केले गेले आहेत. अमेरिकेने मागील दोन दिवसात २ हजारांहून अधिक ठिकाणी हवाई हल्ले केले असून, इराणकडून अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य केले जात आहे.