Video: भयंकर दुर्घटना! बस 'फेरी'मध्ये चढवत असतानाच नदीत कोसळली, २३ प्रवाशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 13:42 IST2026-03-26T13:41:23+5:302026-03-26T13:42:51+5:30

Bus falls into River: बांगलादेशात एका बसचा भयंकर अपघात घडला. बस फेरी बोटीवर चढवत असतानाच नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीत बुडाली. 

Video: Horrific accident! Bus falls into river while being loaded onto ferry, 23 passengers die | Video: भयंकर दुर्घटना! बस 'फेरी'मध्ये चढवत असतानाच नदीत कोसळली, २३ प्रवाशांचा मृत्यू

Video: भयंकर दुर्घटना! बस 'फेरी'मध्ये चढवत असतानाच नदीत कोसळली, २३ प्रवाशांचा मृत्यू

बांगलादेशातील पद्मा नदीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी (२५ मार्च) राजबरी जिल्ह्यात ही घटना घडली. मदत आणि शोध कार्य सुरूच असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

बस नदीत कोसळत असतानाची ही घटना मोबाईलमध्ये शूट झाली आहे. हा व्हिडीओ समोर आला असून, बस नियंत्रणाबाहेर गेली आणि नदीत कोसळताना दिसत आहे. २३ जणांचा मृत्यू या घटनेत झाला असून, त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. 

बस नदीत कोसळतानाचा व्हिडीओ 

पद्मा नदीवर असलेल्या दौलतदिया बंदरावर ही घटना घडली आहे. ढाका येथील असलेली बस फेरी बोटीवर चढवली जाणार होती. सायंकाळी ५.१५ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस फेरीच्या दिशेने जाण्याऐवजी बाजूला गेली आणि नदीत कोसळली. बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील बहुतांश प्रवासी ईदची सुट्टी संपल्यामुळे ढाकाला निघाले होते. मदत आणि शोध मोहीम हाती घेतल्यापासून २३ मृतदेह मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title : भयानक दुर्घटना: बांग्लादेश में बस नदी में गिरी, 23 यात्रियों की मौत

Web Summary : बांग्लादेश की पद्मा नदी में बस गिरने से 23 लोगों की जान चली गई। राजबाड़ी जिले में फेरी पर चढ़ते समय बस नियंत्रण खो बैठी और नदी में जा गिरी। ईद की छुट्टी के बाद ज्यादातर यात्री ढाका लौट रहे थे। बचाव कार्य जारी है।

Web Title : Tragedy: Bus plunges into Bangladesh river during ferry boarding, 23 dead.

Web Summary : A bus accident in Bangladesh's Padma River resulted in 23 fatalities. The bus, en route to a ferry, lost control and plunged into the river in Rajbari district. Most passengers were returning to Dhaka after the Eid holiday. Rescue operations are ongoing.