तालिबानच्या तडाख्यात अमेरिकेचे विमान

By Admin | Updated: October 20, 2015 03:59 IST2015-10-20T03:59:17+5:302015-10-20T03:59:17+5:30

तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तडाख्यात अमेरिकेचे एफ-१६ हे विमान सापडले. आतापर्यंत तालिबानी अतिरेक्यांनी अनेक छोट्या विमानांना लक्ष्य केले आहे; पण अमेरिकेच्या

US plane in Taliban crackdown | तालिबानच्या तडाख्यात अमेरिकेचे विमान

तालिबानच्या तडाख्यात अमेरिकेचे विमान

काबूल : तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तडाख्यात अमेरिकेचे एफ-१६ हे विमान सापडले. आतापर्यंत तालिबानी अतिरेक्यांनी अनेक छोट्या विमानांना लक्ष्य केले आहे; पण अमेरिकेच्या जेटसारख्या विमानालाच लक्ष्य केल्याची ही दुर्लभ घटना आहे. विमानाचा पायलट मात्र सुरक्षित आहे.
मागील आठवड्यात १३ आॅक्टोबर रोजी ही घटना घडली. दहा कोटी डॉलरच्या या अत्याधुनिक विमानाला लक्ष्य करून तालिबान्यांनी गोळीबार केला. यात विमानाच्या स्टॅपलायझरला हानी पोहोचली. प्रसंगावधान राखून पायलटने विमानातील युद्धसामग्री टाकून देत विमान पुन्हा सुरक्षित नेले. हवेतून जमिनीवर मारा करणारे या विमानातील एक मिसाईल, दोन बॉम्ब टाकून हे विमान परतले. (वृत्तसंस्था)

Web Title: US plane in Taliban crackdown