शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकी फोनधारकांना मिळाली ‘हेर’मुक्ती!

By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST

अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था अर्थात एनएसएचा नागरिकांचा हेरगिरी करण्याचा अधिकार रविवारी मध्यरात्रीपासून काही काळ संपुष्टात आला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा संस्था अर्थात एनएसएचा नागरिकांचा हेरगिरी करण्याचा अधिकार रविवारी मध्यरात्रीपासून काही काळ संपुष्टात आला आहे. यापुढे अमेरिकन नागरिकांच्या फोनची माहिती एनएसएला जमा करता येणार नाही. एनएसएच्या या अधिकाराची मुदत वाढविण्यास रिपब्लिकन सिनेटर रँड पॉल यांनी सिनेटमध्ये जोरदार विरोध केला. रविवारी सिनेटचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एनएसएला हा अधिकार देण्यात आला होता. या कालावधीत लागू करण्यात आलेले अनेक वादग्रस्त अधिकार आता मुदत वाढविण्यासाठी काँग्रेस सदस्यांसमोर येणार आहेत. अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने या विधेयकाला मंजुरी दिली होती. त्यामुळे सिनेटचे बहुमताचे नेते मिच मॅकोनील यांना हे विधेयक मांडावेच लागले. सिनेटर पॉल यांनी या विधेयकाला केलेल्या जबरदस्त विरोधाचे स्वागत नागरी हक्क संघटनांनी केले आहे. सिनेटर पॉल अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे आहेत. एरव्ही गुप्तरीत्या चाललेली ही हेरगिरी एनएसएचा कंत्राटदार एडवर्ड स्रोडेन याने उघडकीस आणली होती. सिनेटर पॉल यांनी सिनेटचे नियम जाणून घेतले, त्यानुसार या विधेयकावरील अंतिम मतदान दोन दिवस रोखणे शक्य आहे, हे लक्षात घेऊन विधेयकावर अंतिम मतदान न घेताच सिनेटचे काम संस्थगित करण्यात आले. सिनेटच्या कामकाजासाठी मध्यरात्रीची डेडलाईन आल्यानंतर कामकाज बंद करण्यात आले. नागरिकांच्या फोनची माहिती जमा करण्याच्या या विधेयकात सुधारणा करून मग ते सिनेटमध्ये मंजूर केले जाईल. फोन नंबर जमा करण्याच्या अधिकाराबरोबरच पॅट्रियट कायद्याच्या आणखी दोन कमी महत्त्वाच्या तरतुदीही रद्द करण्यात आल्या आहेत. लोन वूल्फ नावाने असणारी तरतूद फारशी वापरली गेली नाही. याअंतर्गत दहशतवादाचा आरोप असणाऱ्या आरोपीची चौकशी करण्याचे हक्क होते. (वृत्तसंस्था)