Elnaaz Norouzi : "अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:18 IST2026-03-01T12:16:58+5:302026-03-01T12:18:55+5:30

Elnaaz Norouzi : इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे.

us israel iran war actress Elnaaz Norouzi reacts on khamenei killed tehran strikes | Elnaaz Norouzi : "अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

Elnaaz Norouzi : "अविश्वसनीय! आम्ही गेली ४७ वर्षे... "; खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद

अमेरिका आणि इस्रायल मिळून इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर हल्ले करत आहेत. इराणही मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा करत आहे, ज्यामुळे सामान्य जनतेच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. या संघर्षात इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

इराणमधील महिला आणि काही लोक आनंदोत्सव साजरा करताना दिसत असून याचे अनेक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेली इराणी अभिनेत्री एलनाज नोरौजी हिनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केला आहे.

एलनाजने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ही बातमी शेअर केली आहे. "ही आमच्यासाठी सर्वात मोठी आणि अविश्वसनीय बातमी आहे. ज्या बातमीची आम्ही गेली ४७ वर्षे वाट पाहत होतो, ती अखेर आली. खामेनेई  यांचा मृत्यू झाला आहे. देव महान आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. तसेच एलनाजने दुसऱ्या एका स्टोरीमध्ये ही बातमी शेअर करताना 'थँक्यू' म्हणत आनंदाचे इमोजी देखील पोस्ट केले आहेत.

युद्धावर काय म्हणाली एलनाज?

एलनाजने एक व्हिडीओ शेअर करून सांगितलं की, ती टीव्हीवर युद्धाच्या बातम्या सतत पाहत आहे. इराणमध्ये नेमकं काय घडत आहे याची माहिती अनेकांना नसते, त्यामुळे लोक काहीही बोलतात आणि वाद निर्माण होतात. जर या युद्धात कोणताही सामान्य नागरिक मारला गेला, तर त्याला इराण सरकार जबाबदार असेल. हे सरकार गेल्या ४७ वर्षांपासून इराणी जनतेवर अन्याय करत आहे. त्यांनी इराणवर कब्जा केला आहे.


इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा; खामेनेई यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई यांच्याकडे सत्ता

अमेरिका-इस्रायलच्या एअर स्ट्राईकमुळे इराणमधील मुलींची शाळा उद्ध्वस्त; ८५ विद्यार्थिनींचा मृत्यू

अभिनेत्रीने पुढे असंही नमूद केलं की, इराणचे नागरिक अनेक वर्षांपासून हे सरकार जावं म्हणून मागणी करत आहेत. यासाठी आंदोलनंही झाली, पण लोकांचं म्हणणं कोणाही ऐकलं नाही. एलनाजच्या मते, हे युद्ध सरकारच्या हट्टामुळे सुरू झालं असून यात इराणी जनतेचा जीव धोक्यात आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तिने प्रार्थना केली आहे.

"आकाशात क्षेपणास्त्रे, स्फोटांचे आवाज..."; दुबईत अडकला सुपरस्टार; शेअर केला भयानक Video

"आता तर खूप भीती वाटतेय, याचा अंत नाही", ड्रोन हल्ल्यानंतर दुबईतून एका आईचा मेसेज व्हायरल

एलनाज नोरौजीने नेहमीच इराणच्या स्वातंत्र्यासाठी आपला आवाज उठवला आहे. खामेनेई यांनी इरानी महिलांवर अनेक बंधनं घातली होती. हिजाबची सक्ती, बाहेर फिरण्यावर आणि कामावर जाण्याबाबत देखील अनेक बंधनं घातली होती. या नियमांविरुद्ध महिलांनी अनेकदा आंदोलन केलं असून एलनाजनेही त्यात सक्रिय सहभाग घेतला होता.

Web Title : ईरानी अभिनेत्री एलनाज़ नोरौज़ी ने सोशल मीडिया पर खामेनेई की मौत का जश्न मनाया।

Web Summary : ईरान में संघर्ष के बीच, अभिनेत्री एलनाज़ नोरौज़ी ने खामेनेई की कथित मौत पर खुशी व्यक्त की, जिसका 47 वर्षों से इंतजार था। उन्होंने ईरानी सरकार की आलोचना करते हुए कहा कि वह अपने लोगों पर अत्याचार कर रही है, और चल रहे युद्ध के कारण नागरिकों के सामने आने वाले जोखिमों पर प्रकाश डाला, और सुरक्षा के लिए प्रार्थना करने का आग्रह किया।

Web Title : Iranian actress Elnaaz Norouzi celebrates Khamenei's death on social media.

Web Summary : Amidst conflict in Iran, actress Elnaaz Norouzi expressed joy over Khamenei's reported death, a moment awaited for 47 years. She criticized the Iranian government for oppressing its people, highlighting the risks civilians face due to the ongoing war, urging prayers for safety.