शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

इराणविरुद्ध आता जुना शत्रू थेट युद्धात उतरणार, संधीचा घेणार फायदा; भारताचं टेन्शन का वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 19:34 IST

इराण आणि UAE यांचे संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. हा संघर्ष दीर्घकाळापासूनच्या प्रादेशिक वादांमधून निर्माण झाला आहे.

दुबई - इराणविरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाचे पडसाद आखाती देशांमध्ये उमटले. विशेषत: संयुक्त अरब अमीरात(UAE) इराणच्या टार्गेटवर होते. मागील ३ आठवड्यात इराणने यूएईवर २२०० हून अधिक मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले आहेत. त्यामुळे UAE इराणवर संतापला आहे. बऱ्याचदा यूएईने हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची भाषा वापरली. आता UAE यापुढे जात इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. म्हणजे UAE देखील इराणविरोधात अमेरिका-इस्रायलसोबत या युद्धात उडी घेऊ शकतो. 

वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, UAE वरील हल्ले सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहेत त्यामुळे इराणविरुद्ध तो लढाईत सहभागी होऊ शकतो. यूएईने जर युद्धात उडी घेतली तर त्याचा थेट परिणाम भारतावर होईल. संयुक्त अरब अमीरातमध्ये सर्वात मोठ्या संख्येने स्थलांतरित भारतीय समुदाय आहे. UAE मध्ये सुमारे ४२ लाख भारतीय राहतात. जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे ३५% आहेत. त्यामुळे संयुक्त अरब अमीरातमधील संघर्षामुळे भारताचं टेन्शन वाढणार आहे.

UAE युद्धात सहभागी होण्याच्या चर्चेला आणखी एका कारणामुळे बळ मिळाले आहे. अमेरिका इराणवर जमिनीवर आक्रमण करण्याचं प्लॅनिंग करत आहे. इराणचं स्ट्रेट ऑफ होर्मुझवरील नियंत्रण हटवण्यासाठी अमेरिका हे पाऊल उचलणार आहे. अमेरिका होर्मुझजवळील महत्त्वाच्या बेटांवर कब्जा करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यात युएई जमिनी हल्ल्याची सुरुवात करू शकते अशी इराणला शंका आहे. संयुक्त अरब अमीरातकडून (UAE) संभाव्य जमिनी हल्ल्याची गुप्त माहिती इराणला मिळाल्याचं तिथले अधिकारी सांगतात. UAE जमिनीवरील हल्ल्याची सुरुवात करेल आणि त्यानंतर त्यांच्या जमिनीचा वापर करून अमेरिकन सैनिक इराणमध्ये शिरतील असं इराणला वाटते. 

UAE कडून सातत्याने इशारा

संयुक्त अरब अमीरातने गेल्या काही दिवसांत इराणवर हल्ला करण्याचा सातत्याने इशारा दिला आहे. अलीकडेच अमेरिकेतील संयुक्त अरब अमीरातच्या राजदूतांनी म्हटले आहे की, इराणमधील केवळ शस्त्रसंधी पुरेशी ठरणार नाही. शस्त्रसंधीऐवजी प्रदेशात शांतता सुनिश्चित करण्यासाठी निर्णायक तोडगा काढण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी सांगितले. यूएई आणि अमेरिकेची मजबूत भागीदारी आहे. इराणमधील इस्लामिक राजवटीसोबत कोणताही शस्त्रसंधी होऊ नये. दहशतवाद वाटाघाटी न करता संपवला पाहिजे अशी यूएईतील विश्लेषकांना वाटते. 

दरम्यान, इराण आणि UAE यांचे संबंध कायम तणावपूर्ण राहिले आहेत. हा संघर्ष दीर्घकाळापासूनच्या प्रादेशिक वादांमधून निर्माण झाला आहे. २०२० च्या अब्राहम करारानंतर संयुक्त अरब अमीरात इस्रायलच्या अधिक जवळ गेली आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ असलेल्या अबू मुसा आणि टोंब या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या बेटांवरून संयुक्त अरब अमीरात आणि इराण यांच्यात वाद आहे. UAE मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फायदा घेऊन ही बेटे ताब्यात घेऊ शकते अशी इराणला भीती आहे. संयुक्त अरब अमीरात आमच्याविरुद्धच्या युद्धात सक्रियपणे मदत करत आहे असं इराणने सातत्याने असा दावा करत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : UAE may join war against Iran, impacting India: Report

Web Summary : Escalating tensions between Iran and UAE could lead to direct conflict. UAE, allegedly targeted by Iran, might join US-Israel. This raises concerns for India due to the large Indian population in the UAE.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीIranइराणIndiaभारत