युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 12:52 IST2025-08-24T12:50:23+5:302025-08-24T12:52:15+5:30

रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम लष्करी गटांच्या कारवाईनंतर, ही गावे रशियाच्या ताब्यात आली आहेत.

Ukraine in chaos, Russia bombed 143 places; captured two villages in Donetsk! | युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!

युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!


रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात मोठी बातमी आली आहे. रशियन सैन्याने युक्रेनच्या दोन गावांवर कब्जा केला आहे. 'आपल्या सैन्याने गेल्या २४ तासांत युक्रेनच्या डोनेत्स्क (Donetsk) प्रदेशातील स्रेडने आणि क्लेबान बाइक या दोन वस्त्यांवर ताब्यात मिळवला आहे,' असा दावा रशियाने शनिवारी केला. रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, दक्षिण आणि पश्चिम लष्करी गटांच्या कारवाईनंतर, ही गावे रशियाच्या ताब्यात आली आहेत.

युक्रेनच्या 143 ठिकानांवर रशियाची जोरदार बॉम्बिंग - -
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने युक्रेनियन लष्करी औद्योगिक परिसरात आणि युक्रेनियन सशस्त्र दलाच्या तथा परदेशी सैनिकांच्या अस्थायी तळांसह १४३ ठिकाणी हल्ला केला. तसेच, गेल्या आठवड्यात युक्रेनियन हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत, रशियन हवाई संरक्षण प्रणालीने चार मार्गदर्शित हवाई बॉम्ब आणि १६० ड्रोन नष्ट केले. महत्वाचे म्हणजे, अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरू असतानाच, ही घटना घडली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत झेलेन्स्की यांची चर्चा, म्हणाले... - 
तत्पूर्वी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की यांनी दक्षिण अफ्रीकेचे राष्ट्र्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली. यासंदर्भात 'एक्सवर एक पोस्ट करत झेलेन्स्की यांनी सांगितले की, मी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विनंतीवरून बोललो. मी त्यांना आपल्या सहकाऱ्यांसोबतचा कूटनीतिक प्रयत्न आणि वाशिंग्टनमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासोबत झालेल्या बैठकांची माहिती दिल." याच बरोबर, आपण रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत कुठल्याही प्रकारच्या बैठकीसाठी तयार असल्याचेही पुन्हा स्पष्ट केले, असेही त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Ukraine in chaos, Russia bombed 143 places; captured two villages in Donetsk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.