संयुक्त अरब अमिरातीने काही दिवसापूर्वी पाकिस्तानकडे आपल्या पैशांची मागणी केली आहे. पाकिस्तानला या महिन्यात सौदी अरेबियाला ३.५ अब्ज डॉलर्स परत करायचे आहेत. जर पाकिस्तानने हे पैसे परत केले, तर काही दिवसांतच त्याचा परकीय चलन साठा संपुष्टात येईल. हे टाळण्यासाठी, पाकिस्तान सौदी अरेबिया आणि चीनकडून पैशांची मागणी करत आहे.
दोन दिवसापूर्वी पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी केली होती. जगभरात पाकिस्तानने अभिमानाने मान उंचावली असल्याचा त्यांनी दावा केला होता. पण आता, हाच पाकिस्तान पैसा मिळवण्यासाठी धडपडत आहे. पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीचे कर्ज फेडण्याच्या तयारीसाठी कर्ज मिळवण्याकरिता सौदी अरेबिया आणि चीनसोबत चर्चा करत आहे. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनुसार, या चर्चेत कर्ज आणि गुंतवणूक या दोन्ही बाबींचा समावेश आहे. दोन्ही देश मिळून पाकिस्तानला ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्ज देऊ शकतात.
पाकिस्तानकडे केवळ तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा राखीव निधी शिल्लक
संयुक्त अरब अमिरातीचे ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज २०१८ सालापासून पाकिस्तानची मध्यवर्ती बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ पाकिस्तानमध्ये जमा आहे आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण केले जात आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत पहिल्यांदाच पाकिस्तान संयुक्त अरब अमिरातीसोबत कर्जाच्या नूतनीकरणासाठी करार करण्यात अयशस्वी ठरला आहे. तीन अब्ज डॉलर्स व्यतिरिक्त, पाकिस्तानचे संयुक्त अरब अमिरातीकडून घेतलेले ४५० दशलक्ष डॉलर्सचे आणखी एक कर्ज अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
संयुक्त अरब अमिरात दोन्ही कर्जांच्या परतफेडीची मागणी करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचे अंदाजे ३.५ अब्ज डॉलर्स हवे आहेत. पाकिस्तान या कर्जाची परतफेड करत आहे, परंतु यामुळे त्यांच्या परकीय चलन साठ्यावर दबाव येईल. सध्या, पाकिस्तानकडे अंदाजे १६ अब्ज डॉलर्सचा साठा आहे, हा केवळ तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा आहे.
मागील काही महिन्यांत, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील आर्थिक आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ झाले आहेत, तर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील संबंध काहीसे बिघडले आहेत. त्यामुळे, संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानकडून पैशांची तात्काळ केलेली मागणी हे सूचित करते की, पाकिस्तान-सौदी अरेबियाचे वाढते संबंध त्यांना पसंत नाहीत.
Web Summary : UAE demands Pakistan repay billions in debt. Pakistan risks depleting reserves, seeking funds from Saudi Arabia and China. UAE's move hints at displeasure with closer Pakistan-Saudi ties.
Web Summary : यूएई ने पाकिस्तान से अरबों डॉलर का कर्ज चुकाने को कहा। पाकिस्तान का विदेशी मुद्रा भंडार खतरे में, सऊदी अरब और चीन से मदद की गुहार। यूएई की नाराज़गी पाकिस्तान-सऊदी की नज़दीकियों से है।