शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

अमेरिकेत दंगली रोखण्यासाठी लष्कराला पाचारण करणार, ४००० नागरिकांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 8:04 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले.

ठळक मुद्देकृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली.गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली.

वॉशिंग्टन : जॉर्ज प्लॉईड (George Floyd) या ४२ वर्षांच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा एका गौरवर्णी पोलीस अधिकाऱ्याने गळा दाबून खून केल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत उसळलेली संताप व निषेधाची लाट व्हाईट हाऊसच्या अगदी दारात पोहोचली. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उसळलेल्या हिंसक आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशात लष्कराला पाचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. 

डोनाल्ड म्हणाले, "आपली राजधानी वॉशिंग्टन डीसीच्या संरक्षणासाठी वेगवान आणि निर्णायक कारवाई करणार आहे. दंगल आणि मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी लष्काराचे हजारो सैनिक, कर्मचारी आणि अंमलबजावणी अधिकारी पाठवत आहे. तसेच, परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अमेरिकेत यापूर्वीच राष्ट्रीय गार्ड तैनात करण्यात आले आहेत."

याचबरोबर, डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, "जॉर्ज प्लॉईड आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देऊ. जॉर्जच्या दुर्देवी हत्येमुळे सर्व अमेरिकन दु: खी झाले आहेत. माझे पहिले आणि मुख्य कर्तव्य म्हणजे मी देश आणि अमेरिकन लोकांना सुरक्षा देण्याचे आहे. मी शांततापूर्ण निदर्शनास संतप्त जमावात बदलू देऊ शकत नाही. या दंगलीमुळे निष्पाप लोकांचा सर्वाधिक बळी गेला आहे."

आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉशिंग्टन डीसी येथे लष्कराची एक बटालियन तैनात करण्यात आली आहे. जवळपास २५० जवान परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. हिंसक आंदोलनादरम्यान सुमारे चार हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ११ ते मंगळवार सकाळी ५ वाजेपर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे.

दरम्यान, जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या या संतापाचे, आंदोलनाचे लोण अमेरिकेतील १४० शहरांमध्ये पसरले असून, या परिस्थितीमुळे किमान ४० शहरांमध्ये संचारबंदी पुकारण्यात आली आहे. 

आसऱ्याची ५० वर्षांतील पहिली वेळदहशतवादी हल्ल्यासह अन्य काही आणीबाणीचा प्रसंग उद््भवला तर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी या अभेद्य बंकरची सोय केलेली आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात राष्ट्राध्यक्षांना या बंकरचा आसरा घेण्याची वेळ प्रथमच आली. एवढेच नव्हे तर वॉशिंग्टन डीसी या राजधानी क्षेत्रात सुरक्षा दलांनी लागू केलेली सतर्कता ९/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या तोडीची होती. कृष्णवर्णीयांच्या हक्कांसाठी लढणारे नेते मार्टिन ल्युथर किंग (ज्यू.) यांच्या हत्येनंतर सन १९६७ मध्ये उसळलेल्या सामाजिक असंतोषानंतर आताचा अमेरिकेतील उद्रेक तीव्र व व्यापक असल्याचे मानले जात आहे.

...आणि पोलिसांनी गुडघे टेकले जॉर्ज प्लॉईड यांच्या मृत्युनंतर अमेरिकेत निदर्शने सुरु आहेत. एका रॅलीदरम्यान या पोलिसांनी अक्षरश: गुडघे टेकविले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाgeorge floydजॉर्ज फ्लॉईड