शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 08:30 IST

ट्रम्प व्यासपीठावर चढताच टेलिप्रॉप्टर बंद पडला. १५ मिनिटांनंतर तो चालू झाला; परंतु त्यांनी टेलिप्रॉप्टरचा वापर न करताच ५७ मिनिटे भाषण केले.

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात त्यांना आलेल्या वाईट अनुभवानंतर ‘या भयंकर’ घटनांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्र संघानेही याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ‘सिक्रेट सर्व्हिस’ला या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. 

कोणत्या घटनांमुळे ट्रम्प संतापले?संयुक्त राष्ट्र संघात ट्रम्प यांचे भाषण होणार होते. त्यासाठी ते फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासह पोहोचले. सभागृहात जाण्यासाठी एस्केलेटवर चढले खरे; परंतु या स्वयंचलित पायऱ्या अचानक थांबल्या व दोघांनाही पायीच जावे लागले. ट्रम्प म्हणाले की, ‘संयुक्त राष्ट्र संघाला स्वत:ची लाज वाटली पाहिजे. एस्केलेटर क्षणार्धात बंद पडले. थोडक्यात निभावले, नाही तरी मेलानिया आणि मी तोंडावर आपटलो असतो. ट्रम्प व्यासपीठावर चढताच टेलिप्रॉप्टर बंद पडला. १५ मिनिटांनंतर तो चालू झाला; परंतु त्यांनी टेलिप्रॉप्टरचा वापर न करताच ५७ मिनिटे भाषण केले. ट्रम्प म्हणाले की, ‘माझ्या भाषणावर चांगल्या प्रतिक्रिया आल्या. यावेळी मी जी संदर्भाची जुळणी केली तशी फार कमी लोक करू शकतात’. 

स्पीकरच खराब होते भाषणाचा आवाजच नेत्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. कारण, स्पीकर व्यवस्थित कार्यरत नव्हते, असा ट्रम्प यांचा तिसरा आरोप आहे. ट्रम्प म्हणतात, ‘मी मेलानियाला विचारले, माझे भाषण ऐकलेस? ती म्हणाली तुम्ही काय बोललात ते मी ऐकूच शकले नाही.’ यावरून कटाचा संदर्भ ट्रम्प यांनी दिला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump alleges triple conspiracy at UN, orders investigation.

Web Summary : Trump, angered by escalator, teleprompter, and speaker malfunctions at the UN, suspects a conspiracy. He has ordered the Secret Service to investigate these 'terrible' incidents, demanding accountability from the UN.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका