शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

टोकियो जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर, दिल्ली जगात 'या' स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 08:56 IST

‘इकॉनॉमिस्ट'ची पाहणी : दिल्ली ५३व्या क्रमांकावर; वॉशिंग्टन दहाव्या स्थानावर

लंडन : जगातील सर्वाधिक सुरक्षित शहरांमध्ये जपानमधील टोकियो शहराने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्या यादीत दिल्ली ५३ व्या क्रमांकावर आहे. ‘इकॉनॉमिस्ट' या साप्ताहिकाच्या चमुने तयार केलेल्या या यादीत हाँगकाँगची २० व्या क्रमांकापर्यंत घसरण झाली आहे. तर वॉशिंग्टन शहराने आश्चर्यकारकरित्या १० व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

या यादीसाठी जगातल्या पाच खंडातल्या साठ शहरांतील डिजिटल सोयी, आरोग्य व पायाभूत सुविधा, आत्पकालीन यंत्रणा, वैयक्तिक सुरक्षा या मुद्द्यांचा विचार करून तेथील सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेण्यात आला. या यादीत २०१७ साली हाँगकाँग ९व्या क्रमांकावर होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून हाँगकाँगमध्ये काहीसे अस्थिर वातावरण आहे. एक महिन्यापूर्वीपासून या शहरात चीनी वर्चस्वाविरुद्ध आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे.

इकॉनॉमिस्टच्या चमुने केलेल्या या यादीतील पहिल्या दहा शहरांमध्ये आशिया-पॅसिफिक शहरांचे वर्चस्व आहे. त्यामध्ये सिडनी, सेऊल, मेलबोर्न या शहरांचाही समावेश आहे. सर्वाधिक सुरक्षित असलेल्या पहिल्या दहा शहरांच्या क्रमवारीतून अ‍ॅमस्टरडॅम, कोपनहेगन, टोरँटो ही शहरे बाहेर फेकली गेली आहेत. लंडन, न्यूयॉर्क या शहरांनी अनुक्रमे १४ वे व १५ वे स्थान पटकाविले आहे.सर्वाधिक सुरक्षित शहरे या प्रकल्पाचे संपादक नाका कोंडो यांनी सांगितले की, या शहरांमधील नागरिकांकडे किती संपत्ती आहे, प्रत्येक स्तरावर तसेच कारभारामध्ये किती पारदर्शकता आहे या गोष्टींचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या यादीत वॉशिंग्टन शहर २३व्या क्रमांकावर होते. सर्वाधिक सुरक्षित असलेल्या शहरांमध्ये युरोपमधील पॅरिस, फ्रँकफर्ट, झुरिच, स्टॉकहोम या शहरांचा समावेश आहे. मात्र सॅन फ्रँन्सिस्को, लॉस एंजलिस, डल्लास या शहरांची क्रमवारीत घसरण झाली आहे.ढाका ५६ व्या, कराची ५७ व्या स्थानीच्पाकिस्तानमधील कराचीने या यादीत ५७ व्या क्रमांकाचे स्थान पटकावले असून दिल्लीपेक्षा ते शहर कमी सुरक्षित आहे. बांगलादेशचे ढाका शहर ५६ व्या क्रमांकावर आहे.आशिया-पॅसिफिक देशांमध्ये म्हणावी तितकी डिजिटल सुरक्षा नाही असे इकॉनॉमिस्ट साप्ताहिकाच्या चमूने ही यादी तयार करताना म्हटले आहे.

 

टॅग्स :LondonलंडनJapanजपान