शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आज मध्यरात्री दिवस एका ‘लीप’ सेकंदाने लांबणार

By admin | Updated: June 30, 2015 01:55 IST

यंदा ३० जून रोजीचा दिवस अधिकृतरीत्या नेहमीपेक्षा थोडा लांब असेल. कारण या दिवसात एक अतिरिक्त सेकंद वा ‘लीप’ सेकंदाचा समावेश होणार आहे.

वॉशिंग्टन : यंदा ३० जून रोजीचा दिवस अधिकृतरीत्या नेहमीपेक्षा थोडा लांब असेल. कारण या दिवसात एक अतिरिक्त सेकंद वा ‘लीप’ सेकंदाचा समावेश होणार आहे. ग्रीनबेल्ट येथील नासाच्या गोड्डार्ड अंतराळ प्रक्षेपण केंद्राचे डॅनियल मॅकमिलन यांनी सांगितले की, ‘‘पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्याची गती दिवसेंदिवस कमी होत आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीचे गणित जुळविण्यासाठी ‘लीप’ सेकंदाचा समावेश करण्यात येणार आहे.’’ एका दिवसात ८६,४०० सेकंद असतात.प्रमाण वेळेनुसार, लोक आपल्या दैनंदिन जीवनात याचा समन्वित जागतिक वेळेच्या रूपात वापर करतात. ‘कोआॅर्डिनेटेड युनिव्हर्सल टाईम’ची (यूटीसी) आण्विक कालगणनेशी जुळणी करण्यासाठी असा जास्तीचा एक सेकंद घ्यावा लागतो. त्यामुळे ३० जूनचा दिवस ८६,४०० सेकंदांऐवजी ८६,४०१ सेकंदांचा असेल. तथापि, एका सरासरी दिवसात ८६,४००.०२ सेकंद होतात. पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी एवढाच वेळ लागतो. सामान्यत: एक लीप सेकंद ३० जून वा ३१ डिसेंबर रोजी समाविष्ट होतो. १९७२ मध्ये सर्वप्रथम लीप सेकंदाचा वापर करण्यात आला होता.अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सॉफ्टवेअर कंपन्या सज्ज-सामान्यत: घड्याळीमध्ये २३:५९:५९ नंतर येत्या दिवशी ००:००:०० वाजतात. मात्र ३० जून रोजी एक सेकंद नव्याने सामील झाल्यानंतर ते २३:५९:५९ नंतर २३:५९:६० होतील आणि पुन्हा एक जुलै रोजी ००:००:०० वाजतील. -अनेक यंत्रणा एक सेकंदासाठी बंद केल्या जातील. यामुळे येणाऱ्या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी जगभरातील सॉफ्टवेअर कंपन्यांनी तयारी सुरू केली आहे.-अशाच प्रकारे याआधी २०१२ मध्ये घड्याळी वेळेत एक सेकंद वाढविला गेला तेव्हा अनेक कंपन्यांची यंत्रणा कोलमडली होती व खासकरून जावा स्क्रीप्टमधील सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, असे वृत्त ‘दि टेलिग्राफ’ दैनिकाने दिले आहे.