म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 15:45 IST2025-07-08T15:39:09+5:302025-07-08T15:45:09+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हीथ्रो विमानतळावरील आहे. या महिलेचे नाव लुसी व्हाईट आहे.

म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
एका ब्रिटीश महिलेच्या विधानाने सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. या महिलेने भारतीय आणि आशियाई समुदायावर टिप्पणी केली आहे. या लोकांना इंग्रजी येत नाही, त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, असे या महिलेचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना हीथ्रो विमानतळावरील आहे. या महिलेचे नाव लुसी व्हाईट आहे. यासंदर्भात तिने X वर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टवर लोक महिलेवर टीका करत आहेत.
काय म्हमतेय संबंधित महिला -
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिताना लुसी म्हणतात, आपण नुकतेच लंडनमधील हिथ्रो येथे उतरलो आहोत. येथे मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि आशियाई कर्मचारी आहेत. हे लोक इंग्रजीचा एक शब्दही बोलत नाहीत. जेव्हा मी त्यांना म्हणाले की, इंग्रजमध्ये बोला, तेव्हा ते मला 'वंशवादी' म्हणाले. लुसी पुढे म्हणतात, त्यांना हेही माहित आहे की, मी बरोबर बोलत आहे. असे असूनही त्यांनी हे वंशवादी कार्ड वापरले. या सर्वांना यांच्या देशात परत पाठवायला हवे.
Just landed in London Heathrow. Majority of staff are Indian/ Asian & are not speaking a word of English.
— Lucy White (@LucyJayneWhite1) July 6, 2025
I said to them, “Speak English”
Their reply, “You’re being racist”
They know I’m right, so they have to use the race card.
Deport them all. Why are they working at the…
अशा येताहेत लोकांच्या प्रतिक्रिया -
लुसी यांच्या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. काहींनी लुसी व्हाइट यांच्या विधानाचे समर्थन केल आहे. तर, काही लोक म्हणत आहेत, यामुळे एअरपोर्टवर समस्या निर्माण होईल. तर लुसी यांची पोस्ट रेजिस्ट असल्याचेही काहिंचे म्हणणे आहे. एका युजरने म्हटले आहे, आपल्याला हिंदी येते. जर एअपोर्ट स्टाफने एक शब्दही इंग्रजीमध्ये बोलला नसेल, तर तो काय म्हणाला, हे आपल्यला कसं कळलं. आणखी एकाने म्हटले आहे, मी पैज लावू शकतो की तेथे असे काहीही घडले नसते.