शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 21:44 IST

भारताच्या या मदतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नक्कीच मिरची लागली असेल.

तिकडे पाकिस्तानकडूनअफगाणिस्तानवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. तर इकडे भारतानेअफगाणिस्तानला पुन्हा एकदा मानवी मदत पोहोचवली आहे. भारताने अफगाणिस्तानला महत्वाच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी तब्बल ७३ टन जीवनरक्षक औषधे, लसी आणि आवश्यक पूरक साहित्य पुरवले आहे. ही मदत तालिबान सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आली असून, ती अफगाणिस्तानसाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे.

पाकिस्तानला मिरची लागणार -महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढलेला असतानाच, भारत सरकारने ही मदत पाठवली आहे. पाकिस्तान अफगाणिस्तानविरुद्ध गोळीबार आणि ड्रोन हल्ले करत तेथील निर्वासितांना बाहेर काढत आहे. अशा परिस्थितीत, भारताची ही मदत तालिबान सरकारसाठी वरदानापेक्षा कमी नाही. भारताच्या या मदतीने पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना नक्कीच मिरची लागली असेल.

पाकच्या हवाई हल्ल्यात ९ मुलांचा मृत्यू -या पूर्व, पाकिस्तानने अफगाणिस्तानात केलेल्या हवाई आणि ड्रोन हल्ल्यांत नऊ मुलांचा आणि एका महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर तालिबानने सीमापार तणाव वाढल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल, असेही म्हटले होते. हे हल्ले पेशावरमधील आत्मघाती हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी करण्यात आले होते. ज्याचा संबंध पाकिस्तान अफगाण दहशतवाद्यांशी जोडतो.

भारताने यापूर्वीही केली होती मदतयापूर्वी, ऑक्टोबर २०२५ मध्ये, भारताने अफगाणिस्तानला अशाच पद्धतीची मानवी मदत केली होती. तेव्हा भारताने अफगाणिस्तानला २० रुग्णवाहिका (अ‍ॅम्ब्युलन्स) आणि इतर काही वैद्यकीय उपकरणे दान केली होती. ही मदत अफगाण जनतेप्रति भारताच्या दीर्घकालीन बांधिलकीचा भाग होती. यात सुसज्ज रुग्णवाहिका, इतर वैद्यकीय पुरवठा आणि सहा नवीन आरोग्य प्रकल्पांच्या घोषणेचा समावेश होता.

English
हिंदी सारांश
Web Title : India Aids Afghanistan Amid Pakistan Bombing, Taliban Government Pleased

Web Summary : As Pakistan bombs Afghanistan, India provides 73 tons of medical aid, delighting the Taliban government. This follows earlier ambulance donations, highlighting India's commitment amidst regional tensions caused by Pakistan's actions.
टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानmedicinesऔषधं