शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
2
राज्यात पेट्रोल-डिझेलचा एक महिन्याचा साठा; इंधन टंचाईवर छगन भुजबळांची टेन्शन वाढवणारी माहिती
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
Khushboo Patani : Video - "बेटी विदा नहीं, कुर्बान हुई, गप्प बसणारे आई-वडीलही जबाबदार"; खुशबू पाटनीचा संताप
5
होर्मुझ संकटानंतर आता थेट हिंद महासागरात हायव्होल्टेज ड्रामा; इराणचा १० लाख बॅरलचा ऑइल टँकर केला जप्त!
6
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
7
Vastu Tips: नोकरी-व्यवसायात हवीये मोठी झेप? 'या' ५ वास्तू टिप्स नक्की वापरुन पहा
8
मोठा खुलासा! इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची किती विमानं उद्ध्वस्त झाली? थक्क करणारा आहे आकडा; पाहा संपूर्ण यादी
9
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
10
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
11
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
12
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
13
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
14
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
15
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
16
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
17
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
18
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
19
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
20
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:21 IST

Israel-Iran conflict: एक महिला वृत्तनिवेदिका बातम्या सांगत असतानाच इस्त्राइलकडून हल्ला झाल्याचे थेट प्रक्षेपणादरम्यान दिसले होते. तसेच या हल्ल्यामुळे त्या महिला वृत्तनिवेदिकेला बातम्यांचं प्रसारण थांबवावं लागलं होतं. मात्र आता या वृत्तनिवेदिकेने पुन्हा एकदा जिद्दीने आपल्या कामास सुरुवात केली आहे.

इस्राइल आणि इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता भीषण रूप धारण केलं आहे. यादरम्यान, सोमवारी इस्राइलने इराणची सार्वजनिक वृत्तसंस्था असलेल्या आयआरआयबीवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा व्हिडीओसुद्धा समोर आला होता. ज्यामध्ये एक महिला वृत्तनिवेदिका बातम्या सांगत असतानाच हल्ला झाल्याचे थेट प्रक्षेपणादरम्यान दिसले होते. तसेच या हल्ल्यामुळे त्या महिला वृत्तनिवेदिकेला बातम्यांचं प्रसारण थांबवावं लागलं होतं. मात्र आता या वृत्तनिवेदिकेने पुन्हा एकदा जिद्दीने आपल्या कामास सुरुवात केली आहे. तसेच इस्राइलला पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.

इस्राइलने केलेल्या हल्ल्यात इराणच्या नॅशनल टीव्ही कार्यालयाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. तसेच थेट प्रक्षेपणही थांबवावं लागलं होतं. या हल्ल्यात काही जणांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. हा हल्ला झाला तेव्हा बातम्या देत असलेली एक वृत्तनिवेदिका लगबगीने स्टुडियोतून बाहेर पडताना दिली होती. मात्र आता ती पुन्हा एकदा कामावर परतली आहे. तसेच तिने बातम्याही दिल्या आहेत. या महिला वृत्तनिवेदिकेचं नाव सहर इमामी असं असून, ती आता इस्राइलच्या आक्रमणाला इराणकडून करण्यात येत असलेल्या प्रतिकाराचं प्रतीक बनली आहे.

दरम्यान, पुन्हा एकदा टीव्ही स्क्रिनवर दिसल्यावर सहम इराणी यांनी अधिक स्पष्ट आणि दृढपणे आपलं म्हणणं मांडलं. त्या म्हणाल्या की, जे काही घडलं ते इस्राइली सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा हताश प्रयत्न होता. वृत्तसंस्थेच्या इमारतीवर हल्ला करून सत्याचा आवाज दाबता येणार नाही. आम्ही आमचं काम सुरूच ठेवणार आहोत. तसेच राष्ट्रीय वृत्तवाहिनी दृढपणे आपलं काम सुरू ठेवणार आहे, अशा शब्दात त्यांनी इस्राइलला आव्हान दिले.  

टॅग्स :IranइराणMediaमाध्यमेIsraelइस्रायलJournalistपत्रकार