इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 19:23 IST2021-09-10T19:21:20+5:302021-09-10T19:23:49+5:30
अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही.

इस्रायलसंदर्भात काय करणार तालिबान? उघड-उघडच सांगितलं
काबूल - अफगाणिस्तानची सत्ता बळकावल्यानंतर, तालिबानने जगातील जवळजवळ सर्वच देशांसोबत मैत्री करण्यासाठी हात पुढे केला आहे. मात्र, अफगाणिस्तानइस्रायल सोडून इतर सर्व देशांशी संबंध प्रस्थापित करण्यास तयार आहे, असे तालिबानच्या प्रवक्त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे. (Taliban says it wants ties with America rest of the world but not israel)
तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन रशियन वृत्तसंस्था स्पुतनिक न्यूजशी बोलताना म्हणाला, तालिबान अमेरिकेसोबतही काम करण्यास तयार आहे. जर अमेरिकेला नव्या अध्यायात आमच्यासोबत संबंध ठेवायचे असतील, तर आम्ही त्याचे स्वागत करू, हे दोन्ही देशांच्या हिताचे असेल. मात्र, याच वेळी इस्रायलबद्दलच्या प्रश्नावर तालिबानचा प्रवक्ता सुहेल म्हणाला, "आम्ही इस्रायलशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही. आम्हाला सर्व देशांशी चांगले संबंध हवे आहेत, पण त्यांत इस्रायलचे नाव नाही."
Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्...
अफगाणिस्तानमध्ये तालिबानला सत्तेवर आणण्यात पाकिस्तानची मोठी भूमिका आहे. पाकिस्ताननेही इस्रायलला आजपर्यंत मान्यता दिलेली नाही. अशा स्थितीत तालिबानकडून इस्रायलशी संबंध ठेवण्याबाबत आशा केली जाऊ शकत नाही.
तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीनने गेल्या महिन्यात एका इस्रायली माध्यमाशी बोलून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. तथापि, आपण इस्रायली माध्यमाशी अनवधानाने बोललो. आपल्याला ती इस्रायली वृत्तसंस्था आहे, याची बिलकूलच कल्पना नव्हती, असे स्पष्टिकरण सुहेलने दिले होते.