Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 06:17 PM2021-09-10T18:17:43+5:302021-09-10T18:18:01+5:30

Taliban video:तालिबान्यांच्या झोका खेळतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

Video: Taliban's new childishness, tied to the wings of a fighter jet and palying | Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्...

Video: तालिबान्यांचा नवा बालीशपणा, लढाऊ विमानाच्या पंखाला बांधला झोका अन्...

Next

काबुल:तालिबाननंअफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यापासून सोशल मीडियावर अफगाणिस्तानातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात काही वेदनादायक तर काही मजेशीर व्हिडिओ आहेत. काही दिवसांपूर्वी तालिबानी सैनिकांचा लहान मुलांच्या खेळण्या खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हा व्हिडिओ TwitterZahidDOAM नावाच्या यूझरने ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये तालिबानी सैनिक एका लढाऊ विमानाच्या पंखाला दोरी बांधून झोका खेळताना दित आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचे हसू आवरणार नाही. ही विमानं उडत नसली तरी तालिबानी सैनिक त्या विमानांचा पुरेपूर फायदा घेत आहेत.

याआधीही असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात तालिबानी सैनिकांचा बालीशपणा समोर आलाय. यात काही व्हिडिओ जिममध्ये वर्कआऊट करतानाचे तर काही व्हिडिओ अम्युजमेंट पार्कमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावर बसून खेळतानाचे आहेत. याशिवाय, एका व्हिडिओमध्ये तर तालिबानी सैनिक चक्क बॉलिवूडच्या एका गाण्यावर नाच होते. 

 

Web Title: Video: Taliban's new childishness, tied to the wings of a fighter jet and palying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.