महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 11:55 PM2021-08-18T23:55:22+5:302021-08-18T23:56:34+5:30

ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या.

Taliban kills women and feeds dogs says afghan woman | महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घालतात तालिबानी; जीव वाचलेल्या महिलेनं सांगितली आपबिती

googlenewsNext

अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यानंतर तालिबानने (Taliban) नुकतेच म्हटले आहे, की त्यांनी महिलांच्या अधिकारांसंदर्भात आपली भूमिका शिथिल केली आहे. मात्र, तालिबानच्या हल्ल्यातून जीव वाचलेल्या एका महिलेने तालिबानच्या क्रुरतेची जी कहाणी सांगितली, ती जाणून, तुमच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. तालिबानी शिक्षेत महिलांना मारून कुत्र्यांना खाऊ घातले जाते, असा खळबळजनक दावा या महिलेने केला आहे. (Taliban kills women and feeds dogs says afghan woman)

एक टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतात (Afghanistan Ghazni Province) गेल्या वर्षी तालिबानच्या दहशतवाद्यांनी 33 वर्षीय खतेरा (Khatera) यांना गोळी मारण्यात आली होती. या हल्ल्यात त्या कशाबशा जीवंत वाचल्या. खतेरा यांनी सांगितले, की "तालिबानच्या दृष्टीने, महिला केवळ मासाचा पुतळा आहे, ज्यांच्यात जीव नाही, त्यांना केवळ मारहाण केली जाते." पीडित महिलेने सांगितले, की हल्ल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या नोव्हेंबर 2020 पासून पती आणि मुलासह दिल्लीत उपचारासाठी राहत आहेत.

'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

महिलेने सांगितले, की त्यांचे वडील तालिबानचे एक दहशतवादी होते. त्यांनी खतेरावर हल्ल्याचा कट रचला होता. खतेरा अफगाणिस्तान पोलिसांत काम करत होत्या. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्या गर्भवती असतानाच तालिबानने त्यांना प्रचंड मारहाण केली होती. ड्यूटीवरून घरी जाताना त्यांना तीन तालिबानी दहशतवाद्यांनी रोखले होते. यानंतर त्यांनी खतेरा यांचा आयडी तपासला आणि नंतर, त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांना आठ गोळ्या लागल्या होत्या. एवढेच नाही, तर त्यांच्यावर चाकूनेही वार करण्यात आले होते. यानंतर त्या बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यावर चाकूने वार केले आणि त्यांना मरण्यासाठी सोडून दिले.

तालिबानविरोधात लढणाऱ्या सलीमा माझरी कैदेत; बल्ख प्रांतामधून घेतलं ताब्यात

एवढेच नाही, तर तालिबान महिलांसोबत अतिशय क्रुरपणे वागते. कधी-कधी अम्हाला कुत्र्यांना खाऊ घातले जाते. मी नशीबवान आहे, की मी यापासून वाचले. अफगाणिस्तानात तालिबानच्या अधिपत्याखालीच रहावे लागते. येथे महिला, मुलं आणि अल्पसंख्यकावर काय काय अत्याचार केले जातात, याची कल्पना करणेही अवघड आहे, असेही खतेरा म्हणाल्या.


 

Web Title: Taliban kills women and feeds dogs says afghan woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.