'ते आमच्यावर बलात्कार करतील, आम्हाला मारून टाकतील'; अफगाण महिला सैनिकांत तालिबानची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 05:44 PM2021-08-18T17:44:25+5:302021-08-18T17:54:27+5:30

Afghanistan female soldiers : बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.'

कुबरा बेहरोज 2011 मध्ये अफगान नॅशनल आर्मीमध्ये सामील झाली होती. याचा तिला प्रचंड अभिमान होता. मात्र, आता तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर ती अत्यंत भयभीत झाली आहे. (Afghanistan Crisis : Afghanistan female soldiers fear for their lives raped killed taliban)

लष्करात सामील होण्याच्या आपल्या निर्णयासंदर्भात कुबरा बेहरोज म्हणते, 'मला कोणावरही अवलंबून राहायचे नाही. मला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे.' अफगाणिस्तानसारख्या इस्लामिक देशांत सैन्यात महिलांच्या भरतीकडे योग्य दृष्टीने पाहिले जात नाही. बेहरोज सांगते, "माझे माझ्या देशावर प्रेम आहे आणि आमची आधुनिक जगात पाय ठेवणाऱ्या अफगाणांची वेगळी पिढी आहे.'

33 वर्षांच्या बेहरोजने सांगितले, की "मी सकाळच्या सुमारास कामावर गेले होते आणि कुठल्याही सामान्य चेकपॉइंटवर कुणीही पोलीस अथवा सैनिक उपस्थित नव्हता. तसेच, कार्यालयातही कुणीच नव्हते, यामुळे मी घरी आले." एवढेच नाही, तर कुटुंब रस्त्यावर आहे. पण काय करायचे हे कुणालाही माहीत नाही, असेही ती म्हणाली.

बेहरोजने सांगितले, की तालिबान काबूलमध्ये पोहोचण्यापूर्वी तिने, ब्यूटी पार्लर्सच्या मालकांना आपल्या खिडक्यांवर पेंट देताना पाहिले. याशिवाय कॅसेटच्या दुकानांवर कर्मचारी संगीताची उपकरणे नष्ट करताना दिसुने आले. येथे बेहरोजसाठी धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

बेहरोज म्हणते, 'मला भीती वाटते, की एक सैनिक असल्याने माझे अपहरण केले जाईल. मला कारागृहात टाकले जाईल आणि माझ्यावर बलात्कार केला जाईल. मला माझे भवीष्य आणि कुटुंबीयांची चिंता वाटत आहे.' बेहरोजचे काही सहकारी आणि महिला सहकारी सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. 'ते म्हणतात, की आपण तालिबानच्या हाती लागलो, तर ते आपला गळा कापतील.'

बेहरोजची भीती योग्यच आहे. तिचा भाऊ देखील लष्करात आहे. तो गेल्या आठवड्यात गझनी प्रांतात लढताना जखमी झाला होता. तिला कुणीतरी सांगितले होते, की चार वर्षांपूर्वी तालिबान्यांनी दोन महिलांचा शिरच्छेद केला होता. कारण त्या पोलिसात होत्या.

सोशल मीडियावर तालिबानी दहशतवाद्यांकडून विवाहाच्या नावाखाली महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला जातो, अशा बातम्याही फित आहेत. झिना नावाच्या प्रथेप्रमाणे, जर अफगाणिस्तानात एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर तिला तिच्यावर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी भाग पाडले जाते. अन्यथा तिच्या संपूर्ण कुटुंबाला झालेल्या प्रकारासाठी सामुदायिक बहिष्काराला सामोरे जावे लागते.

बेहरोज ही, 2010मध्ये अफगाणिस्तान सरकारने नाटोच्या सहकार्याने सुरू केलेल्या महिला भरती मोहिमेचा भाग होती. या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आधुनिक सैन्य तयार करणे हा होता. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणात शस्त्र चालविणे, नकाशा पाहणे, संगणक, प्रथमोपचार यांचा समावेश होता. या महिला सैनिकांना अमेरिकन, ब्रिटिश आणि जॉर्डनच्या प्रशिक्षकांकडून शारीरिक प्रशिक्षण देण्यात आले होते.

बेहरोजने सांगितले, “हा एक इस्लामिक देश आहे आणि येथे घर आणि शरिराची चेकिंग करण्यासाठी आम्हाला महिला सैनिक आणि पोलिसांची गरज आहे. येथे पुरुषांना असे करण्याची परवानगी नाही." 2020 पर्यंत 10 टक्के महिलांना सैन्यात भरती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते.

अफगाणिस्तानात पुरुषांसोबत काम करणाऱ्या आणि रात्रभर घरापासून दूर राहणाऱ्या स्त्रियांबद्दल सांस्कृतिक पूर्वाग्रह आहे. अशा महिलांवर अनेकदा वेश्यावृत्तीचा आरोपही केला जातो. 2010 मध्ये चर्चेसाठी निवडल्या गेलेले उच्च शांतता परिषदेचे एक तालिबानी सदस्य मौलवी कलामुद्दीन यांनी महिलांना लष्करात भरती करण्यास परवानगी देण्यास राष्ट्रपती करझाई यांना आपला विरोध व्यक्त केला. राष्ट्रपती करझई यांच्याकडे महिलांना सेन्यात सामील करण्यासंदर्भात परवानगी देण्या विरोधात मत व्यक्त केले होते.

गैरवर्तन, धमक्या आणि भेदभावाच्या अनेक तक्रारी आल्यानंतर, सैन्यातील महिलांची भरती कमी करून 3 टक्क्यांवर आणली गेली होती.

Read in English