"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 16:13 IST2025-12-15T16:13:13+5:302025-12-15T16:13:56+5:30
Bondi Beach Shooting : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीचवर झालेल्या हल्ल्यात १६ जणांचा मृ्त्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बॉन्डी बीचवर झालेल्या हल्ल्यात १६ जणांचा मृ्त्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पिता-पुत्राने मिळून केला आणि यात यहूदी लोकांना टार्गेट करण्यात आलं होत. हनुक्का उत्सवादरम्यान झालेल्या या गोळीबारात सहभागी असलेल्या हल्लेखोराने हल्ल्याच्या काही तास आधी आपल्या आईशी फोनवर संवाद साधला होता.
'द सिडनी मॉर्निंग हेराल्ड'नुसार, दहशतवाद्याने आपल्या आईला सांगितलं होतं की, तो नुकताच पोहून परतला आहे आणि आता जेवणासाठी बाहेर जात आहे. घराबाहेर मीडियाशी बोलताना, त्याची आई वेरेनाने सांगितलं की, मुलगा नवीद अकरम याने रविवारच्या सकाळी तिला शेवटचा फोन केला होता. त्यावेळी तो त्याचे वडील साजिद अकरमसह जर्विस बे येथे वीकेंड ट्रीपवर होता.
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
"नवीदने रविवारी मला फोन केला आणि म्हणाला, 'मॉम, मी आताच पोहून आलो आहे. मी स्कूबा डायव्हिंगला गेलो होतो. आता आम्ही जेवण करायला जात आहोत आणि खूप जास्त गरमी असल्याने सकाळी घरी परत येऊ'." या फोन कॉलच्या काही तासांनंतर, साजिद आणि नवीद या दोन्ही पिता-पुत्राने बीचवर यहूदींचा उत्सव असलेल्या हनुक्कादरम्यान गोळीबार सुरू केला.
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
गोळीबारात १० वर्षांच्या एका मुलीसह १५ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी हा हल्ला पिता-पुत्राने केल्याचं म्हटलं आहे. घटनास्थळी पोलिसांनी ५० वर्षीय साजिद अकरमला ठार केलं. २४ वर्षीय नवीद अकरम याच दरम्यान जखमी झाला आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.