झुरीच : पाकिस्तानी नागरिकांनी स्विस बँकांमध्ये पैसे ठेवण्याचे प्रमाण १६ टक्क्यांनी वाढून १.५ अब्ज फ्रँक्स (१० हजार कोटी रुपयांच्याही वर) झाले आहे. भारतीय नागरिकांनी या बँकांमध्ये ठेवलेल्या पैशांपेक्षाही ही रक्कम जास्त आहे.
स्वीत्झर्लंडच्या केंद्रीय बँकेने (स्वीस नॅशनल बँक) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०१५ अखेर पाकिस्तानशी संबंधित पैसा १,५१३ दशलक्ष फ्रँक्स झाला आहे. आधीच्या वर्षी तो १,३०१ अब्ज फ्रँक्स होता. यातील १,४७७ दशलक्ष फ्रँक्स् थेट पाकिस्तानी नागरिकांचे व संस्थांचे आहेत, तर ३६ दशलक्ष फ्रँक्स विश्वस्तांमार्फत किंवा पैशांचे व्यवस्थापन करणाऱ्यांचे आहेत. पाकिस्तानशी संबंधित पैशांमध्ये वाढ होण्याचे हे दुसरे वर्ष आहे. (वृत्तसंस्था)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}