शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 20:05 IST

विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल.

वर्ष २०२७ मध्ये एक खास खगोलशास्त्रीय घटना घडणार आहे. २ ऑगस्ट २०२७ रोजी चाहत्यांना सूर्यग्रहणाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. हे एक दुर्मिळ आणि पूर्ण सूर्यग्रहण असेल. ग्रहण काळात दिवसा आकाशात अचानक अंधार पसरेल आणि पृथ्वीवरील तापमान कमी होईल.

विशेष म्हणजे, हे पूर्ण सूर्यग्रहण दिर्घकाळाचे असेल. जे ६ मिनिटांपेक्षाही अधिक काळ दिसेल. यामुळे हे सूर्यग्रहण, या शतकातील सर्वात दीर्घ पूर्ण सूर्यग्रहण ठरेल. एवढे दीर्घ सूर्यग्रहण आजच्या पीढीला क्वचितच पुन्हा बघता येईल. यामुळेच खगोलशास्त्रज्ञ आणि निरीक्षकांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असेल.

दीर्घ कालावधीचे ग्रहण - साधारणपणे पूर्ण सूर्यग्रहण सुमारे ३ मिनिटांपर्यंत चालते. मात्र २ ऑगस्ट २०२७ रोजी सूर्य पृथ्वीपासून सर्वाधिक दूरच्या बिंदूवर (apogee) असेल, तर चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असेल. या संयोगामुळे चंद्र मोठा दिसेल आणि सूर्याला जवळपास ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत झाकून टाकेन. महत्वाचे म्हणजे, एवढे दीर्घ पुढील ग्रहण २११४ पूर्वी दिसणार नाही.

जगात कुठे कुठे दिसेल ग्रहण? - हे ग्रहण अटलांटिक महासागरावरून सुरू होईल आणि स्पेन व जिब्राल्टर मार्गे उत्तर आफ्रिकेत (मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया) दिसेल. यानंतर ते इजिप्तमधील लक्सर येथे सर्वाधिक काळ दिसेल. पुढे सौदी अरेबिया, येमेन आणि हॉर्न ऑफ आफ्रिका (सोमालिया) ओलांडून हिंदी महासागरात संपेल.

भारतात कुठे कुठे दिसणार? -युरोप, आफ्रिका, मध्य पूर्व आणि आशियाच्या अनेक भागांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल. याशिवाय, भारतात, नवी दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये आंशिक सूर्यग्रहण दिसेल आणि येथे संपूर्ण अंधार होणार नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Longest Solar Eclipse of the Century: Visibility and Details

Web Summary : A rare, long total solar eclipse will occur on August 2, 2027, lasting over six minutes. Visible across Africa and the Middle East, parts of India will experience a partial eclipse. This celestial event is a must-see for astronomy enthusiasts.
टॅग्स :surya grahanसूर्यग्रहणIndiaभारतMumbaiमुंबईdelhiदिल्ली