सौदी अरेबियातील अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला

By Admin | Updated: July 4, 2016 08:17 IST2016-07-04T08:17:29+5:302016-07-04T08:17:29+5:30

जिद्दाह शहरातील अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला असून जिवीतहानी झाल्याची माहिती अजून मिळालेली नाही

Suicidal attacks outside the American ambassador in Saudi Arabia | सौदी अरेबियातील अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला

सौदी अरेबियातील अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला

>ऑनलाइन लोकमत - 
दुबई, दि. 04 - जिद्दाह शहरातील अमेरिकी दुतावासाबाहेर आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला असून जिवीतहानी झाल्याची माहिती अजून मिळालेली नाही. अमेरिकी दुतावासाबाहेर असलेल्या मशिदीबाहेर हल्लेखोर कारमधून आला होता. दुतावासामधील अनेक कार्यालय नव्या ठिकाणी हलवण्यात आली असल्याने सुदैवाने कर्मचारी दुतावासात नव्हते. 
 
या हल्ल्यात दोन सुरक्षारक्षक जखमी झाल्याची माहिती स्थानिक वृत्तवाहिनीने दिली आहे. 2004 मध्ये अमेरिकी दुतावासावर हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला होता. 
 

Web Title: Suicidal attacks outside the American ambassador in Saudi Arabia