शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
4
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
5
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
6
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
7
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
8
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
9
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
10
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
11
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
12
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
13
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
14
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
15
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
16
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
17
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
18
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
19
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
20
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकार! अमेरिकेला वादळाचा तडाखा; ३२ जणांचा मृत्यू, ५० हून अधिक लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 10:46 IST

अमेरिकेतील अनेक भागात आलेल्या भीषण वादळात  ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे मिसूरीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

अमेरिकेतील अनेक भागात आलेल्या भीषण वादळात  ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे मिसूरीमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार, या वादळात अनेक लोक जखमीही झाले आहेत. अर्कांसस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिपेंडन्स काउंटीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 

अर्कांससच्या सार्वजनिक सुरक्षा विभागाने एका निवेदनात म्हटलं आहे की, राज्यातील १६ काउंटींमध्ये घरं आणि व्यवसायिक ठिकाणांचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच विजेचे खांब आणि झाडं कोसळण्याच्या अनेक घटनाही नोंदवल्या गेल्या आहेत. टेक्सास पॅनहँडलमधील अमरिलो काउंटीमध्ये धुळीच्या वादळादरम्यान झालेल्या कार अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मिसूरीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

बेकर्सफील्ड परिसरात वादळामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. मिसूरी, अर्कांसस, टेक्सास आणि ओक्लाहोमा ही राज्य सर्वात जास्त प्रभावित झाली आहेत. मिसूरीमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून तिथे १२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

वादळामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर

जोनास अँडरसन यांनी शनिवारी सकाळी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, अर्कान्सासच्या केव्ह सिटी परिसरात पाच जण जखमी झाले आहेत, जिथे पुढील सूचना मिळेपर्यंत आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात १३० हून अधिक आगी लागल्याने ओक्लाहोमाच्या काही समुदायांमधील लोकांना स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  

टॅग्स :Americaअमेरिका