लंडनमध्ये पान खाऊन थुंकणे महागात पडले; दोन भारतीयांना १.७२ लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:17 IST2026-03-19T19:16:06+5:302026-03-19T19:17:41+5:30

Indian Mens Spitting Paan London: लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान थुंकणे हा गुन्हा मानला जातो.

Spitting paan in London cost a lot; Two Indians fined Rs 1.72 lakh | लंडनमध्ये पान खाऊन थुंकणे महागात पडले; दोन भारतीयांना १.७२ लाखांचा दंड

लंडनमध्ये पान खाऊन थुंकणे महागात पडले; दोन भारतीयांना १.७२ लाखांचा दंड

Indian Mens Spitting Paan London: पान किंवा गुटखा खाऊन थुंकणे भारतात सामान्य आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पान थुंकण्याची सवय परदेशात किती महागात पडू शकते, याचे उदाहरण ब्रिटनची राजधानी लंडनमधून समोर आले आहे. पान थुंकल्याप्रकरणी दोन भारतीय वंशीय व्यक्तींना लाखों रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्रेंट परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एजवेअर येथे राहणारे अक्षत कुमार (३१) यांच्यावर ११ जून २०२५ रोजी किंग्सबरी भागात रस्त्यावर पान थुंकल्याचा आरोप होता. तर, रुइसलिप येथे राहणारे हितेश पटेल (३२) यांच्यावरही १२ जून २०२५ रोजी वेम्बली हिल येथे पान थुंकल्याचा आरोप होता. या दोघांनाही नॉर्थ वेस्ट लंडन मजिस्ट्रेट कोर्टाने प्रत्येकी १,३९१ पाउंड (सुमारे १.७२ लाख रुपये) दंड ठोठावला आहे.

दरम्यान, दोन्ही आरोपी सुनावणीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच आरोप सिद्ध झाले आणि दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान थुंकणे हा गुन्हा मानला जातो. अशा प्रकारासाठी साधारणपणे १०० पाउंड (सुमारे १२ हजार रुपये) दंड आकारला जातो. मात्र नियमांचे उल्लंघन आणि न्यायालयात अनुपस्थिती असल्यास दंड वाढवला जातो. ब्रेंट कौन्सिलने या प्रकारावर कडक भूमिका घेतली असून, पानाच्या पिचकारीमुळे स्वच्छता राखण्यात अडचणी येतात, असे स्पष्ट केले. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध भागांमध्ये नियमित गस्त घालून कारवाई करण्यात येत आहे.

Web Title : लंदन में पान थूकना पड़ा महंगा: दो भारतीयों पर ₹1.72 लाख का जुर्माना

Web Summary : लंदन में दो भारतीय नागरिकों को सार्वजनिक रूप से पान थूकने पर ₹1.72 लाख का जुर्माना लगाया गया। यह घटना ब्रेंट में हुई, जिसके कारण स्थानीय प्रशासन द्वारा सख्त कार्रवाई की गई। दोनों व्यक्ति अदालत में पेश नहीं हुए, जिसके परिणामस्वरूप सार्वजनिक स्वच्छता नियमों का उल्लंघन करने पर जुर्माना बढ़ाया गया।

Web Title : Spitting Paan in London Costly: Two Indians Fined ₹1.72 Lakh

Web Summary : Two Indian nationals in London were fined ₹1.72 lakh for spitting paan in public. The incident occurred in Brent, leading to strict action by local authorities. Both individuals failed to appear in court, resulting in increased penalties for violating public cleanliness rules.