काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:46 IST2025-06-17T12:46:14+5:302025-06-17T12:46:43+5:30

donald trump leaves g7 summit in canada amid iran israel war white house more details

Something big is going to happen...! Donald Trump left the G7 summit halfway during the Israel-Iran war, what exactly happened? | काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?

काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा येथे सुरू असलेली G7 शिखर परिषद अर्ध्यातूनच सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते अमेरिकेला परतले आहेत. मध्य पूर्वेतील (मिडिल ईस्ट) वाढता तणाव, विशेषतः इराण आणि इस्रायल यांच्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर तेहरानमधील नागरिकांना शहर रिकामे करण्याचा इशारा दिला होता. यावरून अमेरिका या मुद्द्यावर अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, व्हाईट हाऊसने सोमवारी एक निवेदन जारी करत, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अमेरिकेत परतले असल्याचे म्हटले आहे. यामुळे, अमेरिका या युद्धात प्रत्यक्षपणे उतरण्याच्या तयारीत तर नाही ना? तसेच, असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत, ज्यांसाठी ट्रम्प यांनी जी७ शिखर परिषद अर्ध्यावरच सोडून परतण्याचे ठरवले? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच इस्रायलचे समर्थन केले आहे. मात्र, थेट युद्धात भाग घेण्यासंदर्भात अमेरिकेने अद्याप कसल्याही प्रकारची औपचारिक घोषणा केलेली नाही. यामुळे, ट्रम्प यांचा हा निर्णय गंभीर संकेत देत आहे.

काय म्हणाले, अमेरिकन परराष्ट्रमंत्री? -
इराणवर एकट्या इस्रायलने हल्ले केले आहेत. या कारवाईत अमेरिकेचा कुठलाही थेट हात नाही. यावेळी अमेरिकेचे प्राधान्य मध्य पूर्वेत तैनात असलेल्या आपल्या सैनिकांची सुरक्षितता निश्चित करणे आहे, असे अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी नुकतेच म्हटले होते.

इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही -
तत्पूर्वी, जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत."

Web Title: Something big is going to happen...! Donald Trump left the G7 summit halfway during the Israel-Iran war, what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.