ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:06 IST2025-10-13T18:04:45+5:302025-10-13T18:06:19+5:30
मागील काही दिवस सुरू असलेल्या गाझा आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. दरम्यान, गाझा कराराचा मार्ग मोकळा झाल्यानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्रायली संसदेत पोहोचले.

ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
मागील काही दिवस सुरू असलेल्या गाझा आणि इस्त्रायलमध्ये संघर्ष सुरू होता. दरम्यान, गाझा कराराचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पइस्रायली संसदेत पोहोचले आहेत. नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना इस्रायलच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या भाषणात कराराशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या. "२० धाडसी बंधक परत येत आहेत. आज बंदुका शांत आहेत, सायरन शांत आहेत. देवाची इच्छा असेल तर ही भूमी आणि प्रदेश कायमचा शांततेत राहील", असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
"ही सुसंवादाची सुरुवात आहे. हा एका नवीन मध्य पूर्वेचा ऐतिहासिक उदय आहे. नेतन्याहूंना सामोरे जाणे सोपे नाही, पण तेच त्यांना महान बनवते. काळातील हा एक असामान्य वळण होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील अलीकडील युद्धबंदी आणि स्थिरतेचा उल्लेख करत म्हटले की, "आकाश शांत आहे, बंदुका शांत आहेत आणि पवित्र भूमीत शांतता आहे.", ट्रम्प हे बोलत असताना सभागृहात गोंधळ सुरू झाला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने घोषणाबाजी करत निषेध केला. यानंतर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सभागृहातून बाहेर काढले.
ओलिसांना सोडण्यासाठी हमासवर दबाव आणण्यासाठी एकत्र आलेल्या अरब आणि मुस्लिम नेत्यांचे डोनाल्ड ट्रम्प यांनी आभार मानले. "हे सर्व देश शांततेसाठी भागीदार म्हणून एकत्र काम करत आहेत हे इस्रायल आणि जगासाठी एक मोठा विजय आहे, असंही ट्रम्प म्हणाले.
नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले
यापूर्वी, इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले होते की, "आपल्या शत्रूंना आता समजले आहे की इस्रायल किती शक्तिशाली आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला करणे ही एक मोठी चूक होती." अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कौतुक करताना, संसदेत उभे राहून केलेल्या टाळ्यांच्या गजरात नेतान्याहू म्हणाले, "आपले मित्र डोनाल्ड ट्रम्प जितके जलद, निर्णायक आणि दृढतेने जगाला पुढे नेत आहेत तितके मी कधीही पाहिले नाही." करार केल्याबद्दल नेतन्याहू यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.