लंडनमधील शाळेत ‘शॉर्ट स्कर्ट’ला बंदी

By Admin | Updated: June 17, 2015 02:28 IST2015-06-17T02:28:37+5:302015-06-17T02:28:37+5:30

भारतीय शाळेत मुलींच्या पोशाखाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येते. त्यावेळी परदेशात मुलींना कसे स्वातंत्र्य असते याचे दाखले देण्यात येतात

'Short skirt' ban on school in London | लंडनमधील शाळेत ‘शॉर्ट स्कर्ट’ला बंदी

लंडनमधील शाळेत ‘शॉर्ट स्कर्ट’ला बंदी

लंडन : भारतीय शाळेत मुलींच्या पोशाखाबाबत अधिक सतर्कता बाळगण्यात येते. त्यावेळी परदेशात मुलींना कसे स्वातंत्र्य असते याचे दाखले देण्यात येतात; पण आता लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मुलींनी कसे पोशाख वापरावेत याचे निर्देश देण्यात आले असून, त्याअंतर्गत मुलींना शॉर्ट स्कर्ट घालण्यास बंदी करण्यात आली आहे. शॉर्ट स्कर्टऐवजी मुलींनी सूट घालावेत असे सांगण्यात आले आहे.
हर्टफोर्डशेअर येथील सेंट मार्गारेट बोर्र्डिंग स्कूलमध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार मुली शाळेत शिकण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर त्यांचे लक्ष शिकण्याकडे असावे. आपण कुठले कपडे घातल्यास अधिक आकर्षक दिसतो याचा विचार करणाऱ्या मुलींचे अभ्यासात लक्ष कसे लागेल. विद्यार्थिनींनी मेकअप कमी करावा, शक्यतोवर शालिन पोशाख करावा, असे स्कूलच्या प्राचार्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांचे कपडे शालिन, त्यांचा आत्मविश्वास वाढवतील असे असावेत. मोठ्या वर्गातील विद्यार्थिनी खालच्या वर्गातील मुलींसाठी आदर्श ठराव्यात असे प्राचार्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

पालकांचा कडाडून विरोध
-द टेलिग्राफने हे वृत्त दिले असून, त्यानुसार पालकांचा शाळेच्या या निर्णयाला कडाडून विरोध आहे. विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असावे, त्यावर असा जुनाट नियम लागू होता कामा नये, असे पालकांचे म्हणणे असून, एका पालकाने शाळेला पत्र लिहून आपले म्हणणे कळवले आहे.
-पण शाळा आपल्या नियमावर ठाम असून, विद्यार्थ्यांनी शाळेत कोणते कपडे वापरावेत याचे नियम नसतील तर मुले फक्त त्याचाच विचार करतील, मग अभ्यासात लक्ष कसे लागणार? मग शाळेत येण्याचा उपयोग काय? असे प्राचार्यांनी विचारले आहे.

Web Title: 'Short skirt' ban on school in London