शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

"दिसल्या की गोळ्या घाला आणि नष्ट करा"; खवळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकन नौदलाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 20:26 IST

अमेरिकेने चर्चेसाठी पुढाकार घेतलेला असताना इराणकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यातच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये तीन मालवाहू जहाजांवर हल्ला केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

"मी अमेरिकेच्या नौदलाला आदेश दिले आहेत की, इराणच्या सुरूंग पेरणाऱ्या बोटी दिसल्या की हल्ला करा आणि नष्ट करा. हे करताना अजिबात विचार करू नका", अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. अमेरिकेने शस्त्रसंधी वाढवल्यानंतर इराणकडून होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर ट्रम्प चांगलेच खवळले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी अमेरिकन नौदलाला आदेश दिले आहेत की, होर्मुझ सामुद्रधुनीत सुरुंग पेरणारी बोट दिसली की गोळ्या घाला आणि नष्ट करा. मग त्या बोटी कितीही लहान का असेना (इराणच्या सर्व १५९ नौदलाच्या जहाजांना जलसमाधी मिळालेली आहे). यात अजिबात विचार करू नका." 

ट्रम्प पुढे म्हणाले की, "त्याचबरोबर आमचे 'माइन स्वीपर्स' सध्या ही सामुद्रधुनी स्वच्छ करण्याचे (पेरलेले सुरुंग शोधून नष्ट करण्याचे) काम करत आहेत. मी हे काम सुरू ठेवण्याचे, पण तिप्पट वेगाने करण्याचे आदेश देत आहे."

आम्हाला घाई नाही, चांगला तोडगा निघावा

यापूर्वी ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, "आम्हाला युद्ध घाईघाईत संपवायचे नाही. पण, आम्हाला एक चांगला तोडगा यात हवा आहे. इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवण्याबद्दल आमच्यावर कोणताही दबाव नव्हता."

इराणचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणाले आहेत?

अमेरिका-इराण यांच्यातील शांतता चर्चेबद्दल अजूनही स्पष्टता आलेली नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे की, इराण चर्चेचे स्वागतच करतो, पण धमक्या यात अडथळा बनू लागल्या आहेत. 

अमेरिकेकडून दुसऱ्या फेरीतील चर्चेसाठी इराणने पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी हे विधान केले आहे. 

"इराण चर्चा आणि कराराचे स्वागतच करतो आणि पुढेही करतच राहील. शब्द न पाळणे, नाकेबंदी करणे आणि धमक्या देणे हे सगळे चर्चेमध्ये अडथळे आणत आहे. तुमचा (अमेरिका) कधीही न संपणारा दुटप्पीपणा, दावे आणि काम यातील फरक जग बघत आहे", अशा शब्दात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांना सुनावले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shoot to Kill: Trump Orders Navy to Destroy Iranian Boats

Web Summary : President Trump ordered the U.S. Navy to destroy Iranian boats laying mines in Hormuz Strait, following renewed tensions. He also instructed to speed up mine-sweeping operations. Iran welcomes talks but denounces U.S. threats and sanctions, hindering progress.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराण