शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

धक्कादायक! फ्रान्समध्ये चर्चमधून तीन लाख मुला-मुलींचं लैंगिक शोषण, तीन हजार जण आरोपी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 5:13 PM

sexually abusing in France Church: फ्रान्समधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये फ्रान्समधील कॅथोलिक चर्चमध्ये सुमारे ३ लाख ३० हजार मुले लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पॅरिस - फ्रान्समधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये फ्रान्समधील कॅथोलिक चर्चमध्ये सुमारे ३ लाख ३० हजार मुले लैंगिक शोषणाची शिकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. (sexually abusing in France Church) हा दावा मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका फ्रान्सिसी रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध करणाऱ्या आयोगाचे अध्यक्ष जीन-मार्क सॉवे यांनी सांगितले की, या रिपोर्टमध्ये पाद्रींसह चर्चमध्ये सहभाग असलेल्या गैर-धार्मिक लोकांकडून करण्यात आलेल्या दुर्व्यवहाराचाही समावेश आहे. (hree lakh accused of sexually abusing three lakh boys and girls from a church in France)

जीन-मार्क सॉवे यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के मुलगे लैंगिक शोषणाने पीडित आहेत. त्याशिवाय सुमारे ६० टक्के मुला-मुलींना भावनिक-मानसिक किंवा लैंगिक जीवनामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका स्वतंत्र आयोगाने तयार केलेल्या सुमारे अडीच हजार पानांच्या या अहवालामध्ये ७० वर्षांपासून प्रकाशात न आलेल्या रहस्यांचा उलगडा केला आहे.

या रिपोर्टमधून सुमारे अंदाजे तीन हजार जणांवर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यापैकी दोन तृतियांश आरोपी हे पाद्री होते. लैंगिक शोषणाच्या काळात ते चर्चमध्ये काम करत होते. सॉवे यांनी सांगितले की, पीडितांच्या एकूण संख्येमध्ये अंदाजे २ लाख १६ हजार लोकांचा समावेश आहे. ते पाद्री आणि अन्य लोकांकडून गैरव्यवहाराची शिकार झाले आहेत. आयोगाने आपला तपास १९५० पासून सुरू केला. 

जीन-मार्क सॉवे यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पीडितांबाबतच्या गहिऱ्या आणि क्रूर उदासीनतेच्या रूपामध्ये चर्चच्या भूमिकेवर टीका केली आहे. सॉवे यांनी सांगितले की, २२ कथित गुन्हे ज्यामध्ये आताही खटला पुढे चालवता येऊ शकेल, अशा गुन्ह्यांना अभियोजकांकडे पाठवण्यात आले आहे. तर ४० पेक्षा अधिक गुन्हे जे खटला चालवण्याच्या दृष्टीने खूप जुने आहेत. मात्र आरोपी अद्याप जीवित आहेत. असे गुन्हे चर्च्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.  

टॅग्स :Franceफ्रान्सCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळInternationalआंतरराष्ट्रीय