शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे येणाऱ्या प्लेनवर अमेरिकेचा हल्ला, 'War Crime' म्हणत इराण भडकला; दिल्लीत कशासाठी येत होतं विमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 08:37 IST

हल्ला झाला तेव्हा हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मानवतावादी मदतीवर झालेला हा थेट हल्ला 'युद्ध गुन्हा' (War Crime) असल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेने इराणमधील मशहद विमानतळावर केलेल्या हल्ल्यात भारताकडे येणाऱ्या एका नागरी विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, इराणच्या 'महान एअर'चे हे विमान, भारतातील मानवतावादी मिशनचा एक भाग म्हणून औषधे आणि वैद्यकीय सामग्री घेण्यासाठी नवी दिल्ली येथे पोहोचणार होते. हल्ला झाला तेव्हा हे विमान मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. इराणने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, मानवतावादी मदतीवर झालेला हा थेट हल्ला 'युद्ध गुन्हा' (War Crime) असल्याचे म्हटले आहे.

विशेष म्हणजे, भारत आणि इराण मानवतावादी कार्यात सध्या एकमेकांना सहकार्य करत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच भारताकडून इराणला मदत साहित्य पाठवण्यात आले होते. भारतीय नागरिकांनीही इराणसाठी मोठ्या प्रमाणावर मदत गोळा केली आहे. यासंदर्भात इराणने भारतीय नागरिकांचे आभारही मानले आहेत. मात्र, या ताज्या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील मदतकार्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"नागरी वस्तूंवर हल्ला करणे हा 'युद्ध गुन्हा'" -इराणच्या नागरी उड्डयन संघटनेने यासंदर्भात एक अधिकृत निवेदनही जारी करत, "नागरी विमानाला लक्ष्य करणे हे १९४४ च्या शिकागो कन्व्हेन्शन आणि १९७१ च्या मॉन्ट्रियल कन्व्हेन्शनमधील आंतरराष्ट्रीय नियमांचे उघड उल्लंघन आहे. तसेच जिनिव्हा कन्व्हेन्शनच्या प्रोटोकॉल १ मधील कलम ५२ चा हवाला देत, नागरी वस्तूंवर हल्ला करणे हा 'युद्ध गुन्हा' आहे," असे इराणने म्हटले आहे. 

अमेरिकाचे गंभीर आरोप - तर दुसरीकडे, अमेरिकेने अद्याप तरी या हल्ल्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. महत्वाचे म्हणजे, महान एअर ही इराणची मोठी खाजगी विमान कंपनी आहे. या कंपनीवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. कंपनीचे संबंध इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कोरशी (IRGC) असल्याचा आरोप वॉशिंग्टनने केला आहे. मात्र, हा आरोप तेहरान नेहमीच फेटाळत आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : US Attack on Iranian Plane Enrages Iran; Heading to India?

Web Summary : An Iranian plane bound for India with humanitarian aid was damaged in a US attack at Mashhad airport. Iran condemns this as a war crime, citing international law violations. The US alleges the airline has ties to Iran's Revolutionary Guard, a claim Tehran denies.
टॅग्स :AmericaअमेरिकाIranइराणIndiaभारतWarयुद्ध