चीनमध्ये ४०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले

By Admin | Updated: June 2, 2015 09:49 IST2015-06-02T09:30:06+5:302015-06-02T09:49:57+5:30

दक्षिण चीनमधील यांगजी नदीत ४०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची घटना घडली असून अद्याप जहाजातील २२ प्रवाशांना वाचवण्यात अधिका-यांना यश मिळा

Ship carrying 400 passengers in China sank in China | चीनमध्ये ४०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले

चीनमध्ये ४०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले

style="font-family: Mangal, Verdana; line-height: 25px;">ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. २ - दक्षिण चीनमधील हुबेई प्रांतातील यांगजी नदीत ४०० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. जहाजातील २२ प्रवाशांना वाचवण्यात अधिका-यांना यश मिळाले असून इतर प्रवाशांनाही वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार, 'इस्टर्न स्टार' नावाचे हे जहाज पूर्वेकडील नानजिंग शहरापासून चाँगकिंग शहराकडे जात असताना सोमवारी रात्री बुदाले. त्यावेळी जहाजावर ४०० हून अधिक प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी अधिका-यांनी तातडीने धाव घेतली. दरम्यान काही पर्यटक पोहत किना-याला लागले तर काहींना तेथील मच्छिमारांनी वाचवल्याचे समजते.
 

Web Title: Ship carrying 400 passengers in China sank in China