शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:24 IST

Relationship: या प्रियकराने सदर तरुणीला सात वर्षांच्या काळात तब्बल ४२ वेळा प्रपोज केलं होतं. मात्र त्याच्या प्रेयसीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, मात्र या हट्टी प्रियकरानेही जिद्द सोडली नाही. अखेरीस...

प्रेमात नकार मिळणं  हे काही प्रियकरांसाठी नवं नाही. अनेकदा पहिला नकार हा होकारच समजून आपल्या प्रेयसीला राजी करण्यासाठी आणखी प्रयत्न करणाऱ्यांची संख्याही या जगात काही कमी नाही. अनेकांना दोन तीन प्रयत्नांनंतर यश मिळतं. मात्र काही जण सतत नकार मिळाल्यानंतर आपले प्रयत्न सोडून देतात. मात्र एका प्रियकराने आपला प्रेम प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सलग ४३ वेळा एकाच प्रेयसीला प्रपोज केल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रियकराने सदर तरुणीला सात वर्षांच्या काळात तब्बल ४२ वेळा प्रपोज केलं होतं. मात्र त्याच्या प्रेयसीने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, मात्र या हट्टी प्रियकरानेही जिद्द सोडली नाही. अखेरीस या प्रियकराने जेव्हा ४३ व्या वेळी तिला प्रपोज केल तेव्हा ती नकार देऊ शकली नाही. या अजब प्रेमप्रकरणाची आता एकच चर्चा होत आहे.

ही प्रेमकहाणी आता इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही प्रेमकहाणी आहे ती युनायटेड किंग्डममधील ल्युक विंट्रिप आणि त्याची गर्लफ्रेंड सारा यांची. ल्युक एक टॅटू आर्टिस्ट आहे. तर सारा एक मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करतात. मात्र लग्नाच्या प्रश्नावरून त्यांचं घोडं अडलं. नात्याला सहा महिने झाल्यानंतर ल्युकने साराला लग्नासाठी गळ घालण्यास सुरुवात केली. मात्र ल्युकने जेव्हा जेव्हा लग्नासाठी मागणी धातली तेव्हा तेव्हा साराने नकार दिला. असं करत करत ल्युक याने सारा हिला तब्बल ४२ वेळा लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र प्रत्येक वेळी त्याला नकारच मिळाला.

लग्नासाठीचे सुमारे ४२ प्रस्ताव नाकारल्यानंतर साराने ल्युकला अखेर ४३ व्या वेळी होकार दिला. त्याचं कारण सांगताना सारा म्हणाली की ल्युक याने नेहमी प्रेम व्यक्त केलं. कधी मला होकार देण्यासाठी भाग पाडलं नाही. त्यामुळे मी ४३ व्या वेळी त्याचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकार केला, असे तिने सांगितले.

४२ व्या वेळी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर सारा हिने पुढच्या वेळी योग्य वेळ असेल तर मी होकार देईन, असे सांगितले होते. मात्र ही योग्य वेळ येण्यासाठी २०२३ हे साल उजाडावे लागले. त्यानंतर ल्युक हा सारा हिला लंडनमधील ग्रिनिज येथे घेऊन गेला. तिथे त्याने तिला प्रपोज केले आणि सारा हिनेही यावेळी कुठलेही आढेवेढे न घेता लग्नाला होकार दिला.  

टॅग्स :relationshipरिलेशनशिपLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टInternationalआंतरराष्ट्रीय