शांतिसैनिकांचा वस्तूंच्या बदल्यात सेक्स

By Admin | Updated: June 14, 2015 03:07 IST2015-06-14T02:21:35+5:302015-06-14T03:07:13+5:30

संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांच्या फौजेमधील अनेक सैनिक आफ्रिकेमध्ये सामान, वस्तू देऊन शरीरसुख मिळवतात असे धक्कादायक वास्तव

Sex in exchange for peace | शांतिसैनिकांचा वस्तूंच्या बदल्यात सेक्स

शांतिसैनिकांचा वस्तूंच्या बदल्यात सेक्स

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांच्या फौजेमधील अनेक सैनिक आफ्रिकेमध्ये सामान, वस्तू देऊन शरीरसुख मिळवतात असे धक्कादायक वास्तव एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
संयुक्त राष्ट्र कार्यालयाच्या इंटरनल ओव्हरसाईट सर्व्हिसेसने (ओआयओएस) दिलेल्या अहवालाने लायबेरियामध्ये कार्यरत असणारे शांतिसैनिक पैसे, दागिने, सेलफोन्स आणि टेलिव्हिजन सेटसारख्या वस्तू देऊन सेक्स मिळवतात अशी माहिती उघड केली आहे.
लायबेरियाची राजधानी मोन्रोव्हियामध्ये १८ ते ३० वयोगटातील ४८९ महिलांपैकी अनेकींंनी ओआयओएसच्या सर्वेक्षणात शांतिसेनेतील सैनिक पैशाच्या, वस्तूंच्या बदल्यात आपल्याशी सेक्स करीत असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे, तर मुलांचेही शोषण शांतिसैनिकांकडून होत असल्याचे उघड झाले आहे.
संयुक्त राष्ट्राचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मॅथ्यू एल्वानाल्थोडुका यांनी लायबेरियामध्ये घडलेल्या गैरवर्तनासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. लैंगिक शोषणाच्या बाबतीत कोणताही गैरप्रकार सहन न करण्याची भूमिका सेक्रेटरी जनरल यांनी घेतली असून या आरोपांचा तपास अत्यंत गांभीर्याने केला जाईल, असेही ते म्हणाले.
या वस्तूंचा वापर :
पैशाबरोबरच शांतिसैनिकांनी लॅपटॉप, परफ्युम, कपडे, बेबी-केअर उत्पादने, बूट, औषधे, सेलफोन्स देऊन सेक्स मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Sex in exchange for peace