"होर्मुजच्या सुरक्षितेसाठी युद्धनौका पाठवा", ट्रम्प यांचं आवाहन; 'जग लाडकी' भारताकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:52 IST2026-03-16T06:43:07+5:302026-03-16T06:52:44+5:30

रविवारी संध्याकाळी इस्रायलने दक्षिण इराणवर पुन्हा तुफान हल्ले सुरू केले असून इराणनेही इस्रायलवर नवे हल्ले केले. या हल्ल्यात इराणने खोर्रमशहर, खेबार शेकान, कदर आणि एमाद अशी क्षेपणास्त्रे वापरली. तसेच सेजील या घन इंधनावर चालणाऱ्या सामरिक क्षेपणास्त्राचा प्रथमच वापर केला. इराणने संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.

Send warships to secure Hormuz Trump appeals Jag Ladki leaves for India | "होर्मुजच्या सुरक्षितेसाठी युद्धनौका पाठवा", ट्रम्प यांचं आवाहन; 'जग लाडकी' भारताकडे रवाना

"होर्मुजच्या सुरक्षितेसाठी युद्धनौका पाठवा", ट्रम्प यांचं आवाहन; 'जग लाडकी' भारताकडे रवाना

कैरो : होर्मुज सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन आदी देशांनी युद्धनौका पाठवाव्यात, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच ट्रम्प यांनी इराणयुद्ध संपवण्यासाठी करार करू इच्छित आहे; मात्र सध्या मांडलेल्या अटी अमेरिका स्वीकारू शकत नाहीत, असेही स्पष्ट केले. दरम्यान रविवारी संध्याकाळी इस्रायलने दक्षिण इराणवर पुन्हा तुफान हल्ले सुरू केले असून इराणनेही इस्रायलवर नवे हल्ले केले. या हल्ल्यात इराणने खोर्रमशहर, खेबार शेकान, कदर आणि एमाद अशी क्षेपणास्त्रे वापरली. तसेच सेजील या घन इंधनावर चालणाऱ्या सामरिक क्षेपणास्त्राचा प्रथमच वापर केला. इराणने संयुक्त अरब अमिरातीतील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिला आहे.

पोप यांचे शांततेचे आवाहन
कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप लिओ चौदावे यांनी मध्यपूर्वेत तातडीने युद्ध थांबवून संवाद सुरू करण्याचे आवाहन  केले. व्हॅटिकनमधील प्रार्थनेदरम्यान त्यांनी सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली.

'जग लाडकी' तेलटँकर  सुरक्षितपणे भारताकडे रवाना -
यूएईतील फुजैराह येथून कच्च्या तेलाचा 'जग लाडकी' हा भारताचा तेलटँकर सुरक्षितपणे भारताकडे रवाना झाल्याची माहिती केंद्र सरकारने रविवारी दिली. 
‘जग लाडकी’ने सुमारे ८०,८०० टन मुरबन (एक विशिष्ट दर्जाचा कच्च्या तेलाचा प्रकार) कच्चे तेल भरून भारतीय वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता फुजैराह येथून प्रस्थान केले. 

जहाजावरील सर्व भारतीय नाविक सुरक्षित असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. होर्मुजमधील सद्य परिस्थिती पाहता भारतीय जहाज बाहेर पडणे हे ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.

Web Title : ट्रम्प ने होर्मुज में युद्धपोतों का आह्वान किया; भारतीय टैंकर सुरक्षित रवाना

Web Summary : ट्रम्प ने ईरान के तनाव और संभावित सौदों के बीच होर्मुज सुरक्षा के लिए युद्धपोतों को तैनात करने का आग्रह किया। इजराइल और ईरान ने हमले किए; यूएई के बंदरगाहों को चेतावनी दी गई। एक महत्वपूर्ण भारतीय तेल टैंकर 'जग लाडकी' सुरक्षित रूप से रवाना हुआ, जो ऊर्जा आपूर्ति के लिए राहत की बात है।

Web Title : Trump Calls for Warships in Hormuz; Indian Tanker Sails Safely

Web Summary : Trump urged nations to deploy warships for Hormuz security amid Iran tensions and potential deals. Israel and Iran exchanged attacks; UAE ports were warned. A vital Indian oil tanker, 'Jag Ladki,' departed safely, a relief for energy supplies.